स्कूल व्हॅन उलटून २ विद्यार्थी जखमी; सुदैवाने जीवीत हानी टळली

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: January 30, 2025 17:33 IST2025-01-30T17:33:21+5:302025-01-30T17:33:54+5:30

Gondia : तिरोडा-गोंदिया मार्गावरील घडली

2 students injured after school van overturns | स्कूल व्हॅन उलटून २ विद्यार्थी जखमी; सुदैवाने जीवीत हानी टळली

2 students injured after school van overturns

गोंदिया : विद्यार्थी वाहून नेणारी स्कूल व्हॅन उलटल्याने चालकासह २ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.३०) सकाळी सेजगाव ते नहरटोला मार्गावर घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली. जखमी विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
प्राप्त माहितीनुसार काचेवानी येथील आदिशक्ती पब्लिक स्कूल असून यात नर्सरी ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शाळेत

परिसरातील सेजगाव व इतर गावातील विद्यार्थी शिक्षण घेतात. गुरुवारी (दि.३०) सकाळी ९ वाजता स्कूल व्हॅन क्रमांक एमएच ३५ एजे १७५० ने चालक सुनील श्रीबासरी (२७) रा. पालडोंगरी हा सेजगाव येथून विद्यार्थ्यांना घेवून काचेवानी येथे जात होता. सेजगाव ते नहरटोला दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्कूल व्हॅन रस्त्याच्या कडेला उलटली. यात चालकासह अक्षित गितेश अंबुले व भावी भरतलाल रहांगडाले हे दोन विद्यार्थी जखमी झाले. तर स्कूल व्हॅॅनमधील इतर आठ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी धावत येत मदत कार्याला सुरुवात केली. तसेच या घटनेची माहिती गंगाझरी पोलिस स्टेशन आणि शाळेच्या व्यवस्थापनाला दिली. जखमी दोन विद्यार्थ्यांवर गोंदिया येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी गंगाझरी पोलिसांनी स्कूल व्हॅन चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
 

स्कूल व्हॅनमध्ये या विद्यार्थ्यांचा समावेश
अपघातग्रस्त स्कूल व्हॅनमध्ये अक्षित गितेश अंबुले व भावी भरतलाल रहांगडाले, सानवी गितेश अंबुले, शिवन्या भगत, क्रिश रहांगडाले, मेहान भगत, शिवम मेश्राम, तोषांत रहांगडाले, गुंजन रहांगडाले, रिनल रहांगडाले, लक्ष पटले आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता. यापैकी अक्षित गितेश अंबुले व भावी भरतलाल रहांगडाले हे दोन विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही.

अपघातानंतर गावकऱ्यांमध्ये रोष

सेजगाव ते नहरटोला येथे स्कूल व्हॅनचा अपघात झाल्यानंतर गावकऱ्यांनी या घटनेला घेवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यामुळे घटनास्थळावर काही वेळ तणावपुर्ण स्थिती निर्माण झाली होती.

Web Title: 2 students injured after school van overturns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.