बालविवाह मुक्तीसाठी गोंदियातील १९८ गावांनी घेतला आहे पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 18:15 IST2024-11-07T18:14:31+5:302024-11-07T18:15:15+5:30
Gondia : इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी बालविवाह मुक्त जिल्ह्यासाठी प्रयत्नरत

198 villages in Gondia have taken the initiative to ban child marriage
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बालविवाह मुक्त भारत मोहिमेचा एक भाग म्हणून इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीमार्फत जिल्ह्यातील १९८ गावांनी बालविवाह मुक्तीसाठी पुढाकार घेऊन गावात जनजागृती केली.
या कार्यक्रमांमध्ये सर्व वयोगटातील, सर्व जाती-धर्मातील महिला, मुले अशा लाखो लोकांनी शपथ घेतली. बालविवाहाला पाठिंबा देणार नाही आणि खपवून घेणार नाही, अशी शपथ गावागावांत घेण्यात आली.
जिल्ह्यातील १९८ गावांमध्ये बालविवाह मुक्तीची जनाजगृती करण्यात येत आहे. इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीचे संचालक अशोक बेलेकर, जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले, कार्यक्रम समन्वय अमित बेलेकर, समन्वयक पूर्णप्रकाश कुथेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात कम्युनिटी सोशल वर्कर दीपमाला भालेराव, अमोल पानतवणे, दुर्गेश भगत, संतकला रहांगडाले, पृथ्वीराज वालदे, भाऊराव राऊत, पुष्पा रहांगडाले, पौर्णिमा शहारे, भाग्यश्री ठाकरे, अनिता ठाकरे, ज्योती ठाकरे, बिंदेश्वरी मलिक, कुलदीप खोब्रागडे, किरण फुले, डिंपल भरडे हे बालविवाह मुक्त गोंदिया जिल्ह्यासाठी प्रयत्नरत आहेत.
बालविवाह करणे गुन्हा
इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीचे संचालक अशोक बेलेकर यांनी बालविवाह हा एक गुन्हा आहे, असे म्हटले आहे. महाराष्ट्र नागरी समाज आणि सरकारने राज्य बालविवाह मुक्त करण्यासाठी दाखवलेल्या बांधिलकीमुळे लवकरच बालविवाह होणार नाहीत. जिथे मुलांना अधिक सुरक्षित वातावरण मिळेल.