प्रतापसिंह राणे काँग्रेसमध्ये, तरीही भाजपा उमेदवाराला पाठिंबा; विश्वजित यांचा गौप्यस्फोट

By किशोर कुबल | Published: May 1, 2024 02:02 PM2024-05-01T14:02:36+5:302024-05-01T14:02:56+5:30

विश्वजित म्हणाले की, 'मोदीजींनी दंड थोपटले हे  माझे नेतृत्व व सत्तरीतील कामाची पावती असावी. मोदीजींनी दिलेल्या श शाबासकीमुळे मला प्रोत्साहन मिळाले आहे. या घटनेतून कोणीही वेगळा अर्थ काढू नये.'

Pratap Singh Rane, despite being in the Congress, supported the BJP candidate Shripad; Vishwajit's secret blast | प्रतापसिंह राणे काँग्रेसमध्ये, तरीही भाजपा उमेदवाराला पाठिंबा; विश्वजित यांचा गौप्यस्फोट

प्रतापसिंह राणे काँग्रेसमध्ये, तरीही भाजपा उमेदवाराला पाठिंबा; विश्वजित यांचा गौप्यस्फोट

पणजी : प्रतापसिंह राणे यांनी काँग्रेसमध्ये असूनही उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात नेहमीच भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांना पाठिंबा दिला व त्यामुळेच श्रीपाद यांना सत्तरीत वेळोवेळी मताधिक्क्य मिळू शकले, असा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केला.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, यावेळीही सत्तरी तालुक्यात श्रीपाद यांचा मताधिक्क्याच्या बाबतीत इतिहास घडणार आहे. माझे वडील प्रतापसिंह यांचे या निवडणुकीतही श्रीपाद यांनाच समर्थन आहे. या बाबतीत ते माझ्याशी बोललेही आहेत.

प्रतापसिंह राणे यांचे श्रीपादभाऊ तसेच भाजपमधील इतर काही नेत्यांकडे वेगळेच नाते आहे. त्यांनी नेहमीच गोव्याच्या विकासाचा ध्यास घेतला. मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक विकासकामे केली. त्यानंतर मनोहर पर्रीकर व आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही चांगले काम करत आहेत. पर्रीकर यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी सावंत यांनी भरून काढलेली आहे.'

दरम्यान, सांकवाळ येथील जाहीर सभेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यासपीठावर विश्वजित यांचे दंड थोपटले होते. तसेच त्यांच्याशी बोलणेही झाले होते. त्याबद्दल विचारले असता विश्वजित म्हणाले की, 'मोदीजींनी दंड थोपटले हे  माझे नेतृत्व व सत्तरीतील कामाची पावती असावी. मोदीजींनी दिलेल्या श शाबासकीमुळे मला प्रोत्साहन मिळाले आहे. या घटनेतून कोणीही वेगळा अर्थ काढू नये.'

पुढे विश्वजित म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शब्द दिला तेव्हापासूनच मी भाजपची विचारधारा स्विकारली. केवळ भाजपच नव्हे तर संघाच्या विचारधारेशीही मी एकरूप झालेलो आहे.  भाजप व संघाचे काम मी मनापासून करीत आहे. ख्रिस्ती, मुस्लिम अशा सर्व धर्मीयांमध्ये माझे चांगले संबंध आहेत.

माणुसकीच्या भावनेतूनच महिलेला घर बांधून दिले 
विश्वजित म्हणाले की, 'राजकारणात असलो तरी मी माणुसकी जोपासली आहे. इतरां प्रमाणे समाज तोडण्याचे काम करत नाही. गरीब, गरजू महिलेला माणुसकीच्या भावनेतूनच घर बांधून दिले. पक्ष म्हणून भाजपचेही वेगवेगळे समाजोयोगी उपक्रम आहेत महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स वाटण्यापासून इतर सर्व प्रकारची मदत दिली जाते.'
 

Web Title: Pratap Singh Rane, despite being in the Congress, supported the BJP candidate Shripad; Vishwajit's secret blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.