गोव्याचे नवनिर्वाचित खासदार विरियातो फर्नांडिस यांनी घेतली राहुल, सोनिया गांधींची भेट

By किशोर कुबल | Updated: June 9, 2024 13:27 IST2024-06-09T13:24:02+5:302024-06-09T13:27:55+5:30

विरियातो यांचे दोघांनीही या विजयाबद्दल अभिनंदन करुन काँग्रेसने दक्षिण गोव्यात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाबासकी दिली.

Newly elected Congress Goa MP Viriato Fernandes met Rahul, Sonia Gandhi | गोव्याचे नवनिर्वाचित खासदार विरियातो फर्नांडिस यांनी घेतली राहुल, सोनिया गांधींची भेट

गोव्याचे नवनिर्वाचित खासदार विरियातो फर्नांडिस यांनी घेतली राहुल, सोनिया गांधींची भेट

किशोर कुबल, पणजी: दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून विजयी ठरलेले काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार विरियातो फर्नांडिस यांनी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासोबत पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेतली.
विरियातो यांचे दोघांनीही या विजयाबद्दल अभिनंदन करुन कॉग्रेसने दक्षिण गोव्यात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाबासकी दिली. विरियातो यांनी दक्षिणेत भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांचा तब्बल १५ हजार मतांनी पराभव केला आहे. भाजपने दक्षिणेतील निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. नवीन चेहरा असूनही विरियातो यांनी हे यश संपादन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Web Title: Newly elected Congress Goa MP Viriato Fernandes met Rahul, Sonia Gandhi