कुंभारजुवेच्या गावातील रस्त्यांचे हॉटमिक्सिंग पूर्ण, आमदाराने स्वखर्चाने केला रस्ता
By समीर नाईक | Updated: May 10, 2024 16:00 IST2024-05-10T15:58:50+5:302024-05-10T16:00:09+5:30
कुंभारजुवाचे आमदार राजेश फळदेसाई यांनी स्वखर्चाने या रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले.

कुंभारजुवेच्या गावातील रस्त्यांचे हॉटमिक्सिंग पूर्ण, आमदाराने स्वखर्चाने केला रस्ता
समीर नाईक, पणजी : कुंभारजुवा मतदारसंघातील बेटावरील गावातील थापन वाड्याकडे जाणारा तसेच थापनवाडा व रामभुवन वाड्यातील असे एकूण तीन रस्ते हॉटमिक्सिंद्वारे गुळगुळीत करण्यात आले.
कुंभारजुवाचे आमदार राजेश फळदेसाई यांनी स्वखर्चाने या रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले.पावसाळा सुरू होण्यास अजून अवधी असला तरी पुढील आठवड्यात बिगरमोसमी मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या कामात कोणताही अडथळा येणार नाही याची खात्री करत ही कामे पूर्ण केली, असे आमदार राजेश फळदेसाई यांनी यावेळी सांगितले.
आचारसंहिता संपण्याची आणि सरकारने कामाला मंजुरी देण्याची वाट पाहिली तर कामे पूर्ण होण्यास आणखी एक वर्ष लागेल, हे माझ्या लक्षात आले. लालफितीत अडकून पडण्यापेत्रा जनतेची वेळेवर सेवा करण्यावर माझा विश्वास आहे, असे फळदेसाई म्हणाले.
अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असलेले रस्ते पूर्ण होण्याची प्रतीक्षा कुंभारजुवाची जनता करत होती. माझ्या मतदारांनी आतापर्यंत राखलेल्या संयमाबद्दल त्यांचे आभार मानतो. इतरही अनेक विकासाभिमुख उपक्रम नियोजित असून ते लवकरच जाहीर करेन, असे फळदेसाई यांनी पुढे सांगितले.
तत्पूर्वी फळदेसाई यांच्या हस्ते मंगलम कासा आमोरा फेज ३ मधील रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. या रस्त्यामुळे तेथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.