गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत महाराष्ट्रात स्टार प्रचारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2024 07:21 IST2024-03-28T07:21:03+5:302024-03-28T07:21:58+5:30

भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री व पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते मिळून ४० स्टार प्रचारकांच्या यादीत सावंत यांचे नाव आहे. 

goa chief minister pramod sawant is a star campaigner in maharashtra for lok sabha election 2024 | गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत महाराष्ट्रात स्टार प्रचारक

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत महाराष्ट्रात स्टार प्रचारक

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची महाराष्ट्रात स्टार प्रचारक म्हणून निवड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच वेगवेगळ्या भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री व पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते मिळून ४० स्टार प्रचारकांच्या यादीत सावंत यांचे नाव आहे. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहीवर सातव्या क्रमांकावर आहेत. तर शिंदे यांचे नाव १२ व्या क्रमांकावर आहे. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सावंत यांनी तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान तसेच त्याआधी कर्नाटकातही तेथील भाजप उमेदवारांचा प्रचार केला होता.

भाजपच्या केंद्रीय नेत्यांमध्ये सावंत यांचे वजन वाढलेले आहे. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या, तीत काही मतदारसंघांची जबाबदारी श्रेष्ठींनी सावंत यांच्याकडे सोपवली होती. सावंत यांनी त्या मतदारसंघांमध्ये त्यावेळी प्रचारही केला

 

Web Title: goa chief minister pramod sawant is a star campaigner in maharashtra for lok sabha election 2024