गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' करावा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना शिष्टमंडळाने दिले निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 14:07 IST2025-07-27T14:00:54+5:302025-07-27T14:07:02+5:30
महाराष्ट्र शासनाने ज्या प्रमाणे गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' घोषित केले आहे, त्या पार्श्वभूमीवर गोव्यातही निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' करावा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना शिष्टमंडळाने दिले निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : यंदा २७ ऑगस्ट या दिवशी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील लाखो गणेशभक्तांच्या भावना, संस्कृतीप्रेमी, स्थानिक कलेची जपणूक करणे यासाठी गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी गोमतंक मंदिर महासंघाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी गोमंतक मंदिर महासंघाच्या शिष्टमंडळात गणेशपुरी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दीपक गोवेकर, सुजन नाईक व दिनीन पेडणेकर, हिंदू जनजागृती समितीचे सत्यवान म्हामल यांचा समावेश होता. यापूर्वी गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' म्हणून मान्यता देण्याची मागणी करणारे सूत्र विधानसभेच्या चालू अधिवेशनात मांडावे, अशी मागणी करणारे निवेदन आमदार दाजी साळकर व मंत्री सुभाष फळदेसाई यांनाही देण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने ज्या प्रमाणे गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' घोषित केले आहे, त्या पार्श्वभूमीवर गोव्यातही निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.