उत्तर गोव्यात ११७१ प्रकल्प; विरोधकांना ही विकासकामे दिसणार कशी?: श्रीपाद नाईक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2024 01:12 PM2024-04-23T13:12:59+5:302024-04-23T13:13:36+5:30

विरोधी पक्ष तसेच प्रतिस्पर्धी उमेदवार श्रीपाद यांनी काहीच कामे केली नसल्याची टीका वेळोवेळी करीत असतात.

1171 projects in north goa how will opponents see these developments ask bjp shripad naik | उत्तर गोव्यात ११७१ प्रकल्प; विरोधकांना ही विकासकामे दिसणार कशी?: श्रीपाद नाईक 

उत्तर गोव्यात ११७१ प्रकल्प; विरोधकांना ही विकासकामे दिसणार कशी?: श्रीपाद नाईक 

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : २५ वर्षाच्या खासदारकीच्या काळात उत्तर गोव्यात १४७६ प्रकल्प मंजूर करून घेतले व त्यातील ११७१ पूर्णही झाल्याचा दावा भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी केला.

विरोधी पक्ष तसेच प्रतिस्पर्धी उमेदवार श्रीपाद यांनी काहीच कामे केली नसल्याची टीका वेळोवेळी करीत असतात. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले का, '२५ वर्षे मतदारसंघात न फिरलेल्या विरोधकांना मी केलेली विकासकामे दिसणार कशी?'

श्रीपाद यांच्या या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिका काल प्रकाशित करण्यात आली. याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे उपस्थित होते. धारगळमधील आयुष इस्पितळात ३३८ नोकऱ्यांपैकी २३७ गोमंतकीयांना दिल्याचा दावा त्यांनी केला.

राज्यात वेगवेगळ्या सरकारी इस्पितळांमध्ये १४० आयुष डॉक्टरांची भरती केल्याचे ते म्हणाले. २०१४ ते २०२४ या दहा वर्षांत खासदार निधीतून ९१ समाज सभागृहे व ७१ स्मशानभूमी बांधल्याचे ते म्हणाले.
 

Web Title: 1171 projects in north goa how will opponents see these developments ask bjp shripad naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.