पाण्यासाठी नगरपंचायतीवर धडकला महिलांचा हंडा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 16:42 IST2024-05-08T16:41:44+5:302024-05-08T16:42:23+5:30
अहेरीत आंदोलन : नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांविरोधात घोषणा

Handa Morcha of women hit the municipal council for water
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : येथील नगरपंचायतीअंतर्गत प्रभाग क्र. १६ व १७ मध्ये पाण्याची समस्या बिकट आहे. ७ मे रोजी महिलांनी हंडे घेऊन नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नगराध्यक्षांसह मुख्याधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.
नगरपंचायत कार्यक्षेत्रात येत असलेल्या प्रभाग क्र.१६ व १७ मौजा चेरपल्ली व गडअहेरी या जवळपास दोनशे पेक्षा अधिक कुटुंबांच्या वस्त्या आहेत. २०१४ पूर्वी नळ जोडणी केलेली होती. गावात दोन हातपंप असून त्यापैकी एक बंद आहे. सन २०२१ पूर्वी महिन्यातून फक्त दहा दिवसच नियमित पिण्याचे पाणी सोडले जात होते. दोन ते अडीच वर्षांपासून मौजा गडअहेरी या गावाला ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालय अहेरीमार्फत नियमित पाणी दिले जात नव्हते. नगरपंचायत प्रशासनाला निवेदने देऊन, विनंती करूनसुद्धा पाणी पुरवठा होण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नाही. त्यामुळे
मंगळवारी संतप्त महिलांनी मोर्चा काढला.
यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सुनीता दुर्गे, लक्ष्मी आत्राम, आकांक्षा ओडरे, अलका मराठे, सुनीता राऊत, सिद्धू वाघाडे, मोनाबाई आयल, साधना मेश्राम, शारदा आत्राम, रोहिणी आयदोल, कमला आत्राम, हिंगोली आत्राम, प्रेमीला आत्राम, कोमल गलबले, सरिमा गलबले, भाग्यश्री आत्राम, संगीता राऊत, लता राऊत, सुरेखा राऊत, संगीमा गलबले राहुल दुर्गे, अॅड. पंकज दहागावकर, कुणाल मेश्राम, भारत गलबले, विनोद दहागावकर, सचिन दुर्गे आदी उपस्थित होते. लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी माघार घेतली.
गडअहेरी भागात व समस्या असल्या ठिकाणी ग्रामीण
पाणी पुरवठा कार्यालयामार्फत पाण्याचा पुरवठा केला जाईल. तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाहीत, याकडेही लक्ष आहे. आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल.
जोरदार
- अनिल दाते, मुख्याधिकारी, न.पं.