गडचिरोली : तीन ठिकाणी तांत्रिक अडचण, हेलिकॉप्टरने अर्ध्या तासात पोहोचविले नवीन ईव्हीएम

By संजय तिपाले | Published: April 19, 2024 12:14 PM2024-04-19T12:14:22+5:302024-04-19T12:14:56+5:30

अहेरीवरुन तातडीने हेलिकॉप्टरने नवीन तीन ईव्हीएम पोहोचविण्यात आले व प्रक्रिया सुरळीत सुरु झाली.

gadchiroli Technical problem at three places Helicopter delivered new EVMs in half an hour | गडचिरोली : तीन ठिकाणी तांत्रिक अडचण, हेलिकॉप्टरने अर्ध्या तासात पोहोचविले नवीन ईव्हीएम

गडचिरोली : तीन ठिकाणी तांत्रिक अडचण, हेलिकॉप्टरने अर्ध्या तासात पोहोचविले नवीन ईव्हीएम

गडचिरोली : तेलंगणा सीमेवर शेवटच्या टोकावरील सिरोंचात मतदान प्रक्रिया सुरु असताना तीन ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यानंतर अहेरीवरुन तातडीने हेलिकॉप्टरने नवीन तीन ईव्हीएम पोहोचविण्यात आले व प्रक्रिया सुरळीत सुरु झाली.

जिल्हा पोलिस दलाकडे दोन हेलिकॉप्टर उपलब्ध आहेत. मात्र, निवडणूक काळात सुरक्षेच्या दृष्टीने दुर्गम, अतिदुर्गम  भागात मतदान पथके, ईव्हीएम व इतर साहित्य पोहोचविण्यासाठी आणखी सात हेलिकॉप्टर सज्ज आहेत. एकूण ९ हेलिकॉप्टरद्वारे मतदान अधिकारी व ईव्हीएम पोहोचविण्यात आले आहेत. दरम्यान, ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाल्यास नक्षलप्रभावित व संवेदनशील भागात नवीन ईव्हीएम पोहोचविण्यासाठी अहेरी येथे पोलिस दलाने हेलिकॉप्टर सज्ज ठेवले होते.

१९ एप्रिलला सकाळी नऊ वाजता सिरोंचात तीन मतदान केंद्रांवरील ईव्हीएममध्ये बिघाड झाला. त्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला. अखेर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदित्य जीवने यांनी वरिष्ठांनी संपर्क केला. त्यानंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अहेरी येथून राखीव  म्हणून ठेवलेल्या ईव्हीएममधून तीन ईव्हीएम हेलिकॉप्टरने पाठवून दिले. त्यामुळे प्रक्रिया पूर्ववत सुरु झाली. सुरक्षेच्या कारणास्तव संवेदनशील भागात यंत्रणेकडून यावेळी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येत आहे.

Web Title: gadchiroli Technical problem at three places Helicopter delivered new EVMs in half an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.