‘यंगिस्तान’आॅस्करच्या शर्यतीत
By Admin | Updated: December 19, 2014 22:44 IST2014-12-19T22:44:03+5:302014-12-19T22:44:03+5:30
जॅकी भगनानी आणि नेहा शर्माची भूमिका असलेल्या ‘यंगिस्तान’ या चित्रपटाला भारताकडून बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म या विभागासाठी स्वतंत्र प्रवेशिका म्हणून आॅस्करसाठी पाठविण्यात आले आहे

‘यंगिस्तान’आॅस्करच्या शर्यतीत
जॅकी भगनानी आणि नेहा शर्माची भूमिका असलेल्या ‘यंगिस्तान’ या चित्रपटाला भारताकडून बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म या विभागासाठी स्वतंत्र प्रवेशिका म्हणून आॅस्करसाठी पाठविण्यात आले आहे. ‘यंगिस्तान’ हा तेलुगू चित्रपट ‘लीडर’चा रिमेक आहे. चित्रपटात एका तरुणाची कथा दाखविण्यात आली आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर तो राजकारणात जातो आणि भारताचा पंतप्रधान बनतो. सय्यद अहमद अफजलचे दिग्दर्शन असलेला ‘यंगिस्तान’ हा चित्रपट २८ मार्च २०१४ ला रिलीज झाला होता.