तुम्हीही होऊ शकता सुपर हीरो
By Admin | Updated: July 8, 2015 03:03 IST2015-07-07T22:08:19+5:302015-07-08T03:03:33+5:30
तुमच्या मते सुपर हीरो कोण बनू शकते? असे एका मुलाने विचारल्यावर सलमान म्हणाला की, त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात व त्याआधी आपले शिक्षण पूर्ण करावे लागते

तुम्हीही होऊ शकता सुपर हीरो
तुमच्या मते सुपर हीरो कोण बनू शकते? असे एका मुलाने विचारल्यावर सलमान म्हणाला की, त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात व त्याआधी आपले शिक्षण पूर्ण करावे लागते; त्यानंतर तर कोणीही सुपर हीरो होऊ शकतो. दुसऱ्या एका मुलाने विचारलेल्या प्रश्नावर सलमानने ‘बजरंगी भाईजान’मधील भूमिकेची माहिती दिली. तो म्हणाला की, हा मुलगा हनुमानाचा भक्त आहे व त्याला सगळे बजरंगी म्हणत असतात. जेव्हा तो एका मुलीला तिच्या घरी पोहोचविण्यासाठी पाकिस्तानात जातो तेव्हा तेथील लोक त्याला प्रेमाने भाईजान म्हणतात. याप्रकारे तो येथे बजरंगी व तेथे भाईजान म्हणून ओळखला जातो व तो सगळ्यांना प्रेमाचा संदेश देतो.
सलमान खान आपल्या कुत्र्यावर खूप प्रेम करतो. एकवेळ त्याचा घरी खूप कुत्री असत. आपल्याकडील खूप कुत्री मेल्याचे दु:ख त्याला खूप वाटते. सध्या त्याच्याकडे मायसन नावाचा कुत्रा असून, त्याच्याशी त्याचे खूप जमते. त्याने सांगितले की, लवकरच ते कुत्र्यांच्या कुटुंबात नवा सदस्य आणणार आहेत. सलमानने त्याच्या आतापर्यंतच्या सगळ्यात आवडत्या चित्रपटांत ‘मैने प्यार किया’चे नाव घेतले. एका मुलाने तसा प्रश्न विचारला होता.
‘‘खूप अभ्यास करा, दंगामस्तीही करा’’ असा संदेश देताना सलमानने मुलांचा प्रेमाने निरोप घेतला. मुलांनीही मग प्रतिसाद म्हणून त्यांना ‘बजरंगी भार्ईजान’च्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.