‘एक व्हिलन’ची घोडदौड सुरूच

By Admin | Updated: July 7, 2014 23:01 IST2014-07-07T23:01:16+5:302014-07-07T23:01:16+5:30

गेल्या काही महिन्यांपासून प्रदर्शित झालेल्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे चित्र होते.

A whirlwind croaking continues | ‘एक व्हिलन’ची घोडदौड सुरूच

‘एक व्हिलन’ची घोडदौड सुरूच

गेल्या काही महिन्यांपासून प्रदर्शित झालेल्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे चित्र होते. मात्र गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी जासूस’ आणि ‘लेकर हम दिवाना दिल’ या चित्रपटांना मात्र प्रेक्षकांनी प्रतिसाद न दिल्याने ते आपटले. त्यामुळे हा आठवडा बॉलीवूडसाठी निराशादायक होता. त्या तुलनेत मात्र ‘एक व्हिलन’ चित्रपटाने 92 कोटींचा गल्ला पार केला असून सुपरहिट चित्रपट ठरला आहे. 
विद्या बालनने ‘डर्टी पिक्चर’ आणि ‘कहानी’ या चित्रपटातल्या अभिनयकौशल्याने आपले एक स्थान निर्माण केले आहे. ‘घनचक्कर’सारखा टुकार चित्रपट करूनही विद्याच्या त्या स्थानाला धक्का बसला नव्हता. तिच्या लोकप्रियतेचा पुरेपूर फायदा ‘बॉबी जासूस’ चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान घेतला गेला. मात्र तरीही विद्याची जादू या वेळी म्हणावी तशी चालली नाही. पहिल्याच दिवशी चित्रपटाने 1.78 कोटींची कमाई करत आश्चर्याचा धक्का दिला. शनिवारी ही कमाई 3 कोटींपेक्षाही जास्त होती. पण रविवारी मात्र म्हणावा तितका प्रतिसाद चित्रपटाला मिळाला नाही. एकूण तीन दिवसांत चित्रपटाने साडेसात कोटींची कमाई केली आहे. कमकुवत कथा आणि गोंधळलेल्या शेवटामुळे मात्र प्रेक्षकांना निराश केले. त्यामुळे त्याचा जबरदस्त परिणाम चित्रपटावर झाला. 2क् कोटींपेक्षा जास्त बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची ही कमाई नक्कीच निराशादायक आहे. एकूणच चित्रपटाने फ्लॉपच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. 
या  चित्रपटाबरोबरच प्रदर्शित झालेल्या ‘लेकर हम दिवाना दिल’ चित्रपटाची अवस्था तर अत्यंत वाईट आहे. मुंबईतल्या श्रीमंत भागात राहणा:या दोन मुलांची प्रेमकथा प्रेक्षकांना अजिबातच भावली नाही. तीन दिवसांत चित्रपटाने जेमतेम 1.5 कोटींची कमाई केली. त्यामुळेच चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. प्रेक्षकच नसल्याने चित्रपट चित्रपटगृहातून काढला गेल्याच्या बातम्याही ऐकायला मिळत आहेत. खरे तर राज कपूरचा नातू या चित्रपटातून पदार्पण करणार असल्याने या चित्रपटाविषयी बॉलीवूडलाही उत्सुकता होती. त्यासाठी सैफ अली खानच्या कंपनीनेही पुढाकार घेतला. संपूर्ण कपूर खानदानाने हिरिरीने चित्रपटाची प्रसिद्धी केली होती. पण हा सगळा फुसका बार ठरल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. भविष्यात हा चित्रपट तरेल ही अपेक्षाही संपली आहे. वर्षभराच्या टुकार चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाने अव्वल स्थान पटकावले आहे. बॉक्स ऑफिसवर मात्र ‘एक व्हिलन चित्रपटाची घोडदौड सुरूच आहे. एकता कपूरच्या कंपनीत बनलेल्या आणि दोन खलनायकांची कथा असलेल्या या चित्रपटाला जबरदस्त लोकप्रियता मिळाली आहे. पहिल्याच आठवडय़ात 5क् कोटींपेक्षा जास्त कमाई केलेल्या चित्रपटाने पुढच्या आठवडय़ातही तिकीट खिडकीवर आपली पकड असल्याचे सिद्ध केले. आतार्पयत त्याने 92 कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून लवकरच तो 1क्क् कोटी क्लबमध्ये स्थान मिळवणार असल्याची चिन्हे आहेत. चित्रपटात ए ग्रेड कलाकार नव्हता. याआधी अक्षय कुमारच्या ‘हॉलिडे’ चित्रपटातही तसेच होते. तरीही हॉलिडेनंतर शंभर कोटी क्लबमध्ये स्थान मिळवणारा हा दुसरा चित्रपट ठरेल. 
येत्या शुक्रवारी वरुण धवन आणि आलिया भट्टचा ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. करण जोहर स्टाईलमधे हा चित्रपट बनला आहे. प्रोमोजवरून या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाकडून तरुणाईला खूप अपेक्षा असल्याचेही चित्र आहे. 

 

Web Title: A whirlwind croaking continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.