करायचे आहेत रिअॅलिटी शोज
By Admin | Updated: April 3, 2017 03:18 IST2017-04-03T03:18:31+5:302017-04-03T03:18:31+5:30
नेहा पेंडसे सध्या ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेत एका बॉसची भूमिका साकारत आहे

करायचे आहेत रिअॅलिटी शोज
नेहा पेंडसे सध्या ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेत एका बॉसची भूमिका साकारत आहे. या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. नेहाने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपट-मालिका, हिंदी चित्रपट-मालिकांमध्ये, दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले आहे. आज एक यशस्वी अभिनेत्री म्हणून आपली ओळख मिळवल्यानंतर नेहाला काहीतरी वेगळे करायचे आहे.अनेक वर्षे मालिकांमध्ये काम केल्यानंतर आता नेहाला रिअॅलिटी शोमध्ये तिचे भाग्य आजमावायचे आहे. रिअॅलिटी शो करण्याची इच्छा असल्याचे तिने नुकतेच बोलून दाखवले आहे. डान्स रिअॅलिटी शो अथवा एखादा अॅक्शन रिअॅलिटी शो करण्याचा गेल्या कित्येक दिवसांपासून माझा विचार आहे, असे नेहा सांगते. नेहा ही खूप चांगली डान्सर असून तिने तिच्या नृत्याची कला अनेक चित्रपटांमध्ये दाखवली आहे. रिअॅलिटी शोसोबतच तिला एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनदेखील करायचे आहे. तिने तिच्या कारकिर्दीत कधीच सूत्रसंचालन केले नसल्याने तिला सूत्रसंचालन करून पाहायचे आहे. कोणत्याही कलाकाराला एकाच साच्यातील भूमिका करणे आवडत नाही. त्यामुळे नेहाला आता वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायच्या आहेत. असे तिने सांगितले आहे.