वहीदा रेहमान पुन्हा बंगाली सिनेमात
By Admin | Updated: April 25, 2015 23:12 IST2015-04-25T23:12:02+5:302015-04-25T23:12:02+5:30
बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान या ५३ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बंगाली सिनेमाकडे वळल्या आहेत.

वहीदा रेहमान पुन्हा बंगाली सिनेमात
बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान या ५३ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बंगाली सिनेमाकडे वळल्या आहेत. सत्यजित रे दिग्दर्शित ‘अभिजान’ या सिनेमानंतर आता अर्पणा सेन यांच्या नव्या बंगाली सिनेमात त्या अभिनय करणार आहेत. याविषयी बोलताना वहीदाजी म्हणाल्या की, ‘अभिजान’साठी मी हिंदी, भोजपुरी, बंगाली आणि उर्दू शिकले होते, त्यामुळे तो अनुभव खूप चांगला होता. आता पुन्हा एकदा नव्या प्रोजेक्टसाठी काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.