वेडेपणच कलाकाराला यश देते
By Admin | Updated: December 14, 2014 00:44 IST2014-12-14T00:44:44+5:302014-12-14T00:44:44+5:30
श्रेयस तळपदेने ‘बाजी’ या आगामी चित्रपटात अनेक स्टंट्स केले आहेत. ‘मी आतार्पयत हिंदी चित्रपटांमध्ये चुटूकपुटूक अॅक्शन स्टंट केले आहेत.

वेडेपणच कलाकाराला यश देते
>सायली कडू ल्ल मुंबई
श्रेयस तळपदेने ‘बाजी’ या आगामी चित्रपटात अनेक स्टंट्स केले आहेत. ‘मी आतार्पयत हिंदी चित्रपटांमध्ये चुटूकपुटूक अॅक्शन स्टंट केले आहेत. मात्र बाजीच्या निमित्ताने मोठय़ा प्रमाणावर स्टंट्स करण्याची संधी मिळाली. स्वत:च्या जॉनरबाहेर जाऊन काहीतरी वेगळे करण्यासाठी कलाकाराचे वेडेपणच त्याला यश देते,’ असे तो ‘लोकमत’शी बोलताना म्हणाला.
‘बाजी’चा थिएटरीकल ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. तो ट्रेलर पाहून श्रेयसच्या चाहत्या वर्गात या चित्रपटात त्याने सादर केलेल्या स्टंट्सचीच चर्चा रंगली. या भूमिकेसाठी श्रेयसने अक्षरश: ‘बाजी’ लावली आहे. चित्रपटात भरपूर स्टंट्स आणि अॅक्शन सिक्वेन्स पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांना श्रेयसचे हे रूप बघण्याची उत्सुकता आहे.
‘बाजी’मधील सर्व स्टंट्सचे दिग्दर्शन दाक्षिणात्य सुप्रसिद्ध स्टंटमन सिलव्हा यांनी केले आहे. याबाबत श्रेयस म्हणाला, ‘सिलव्हा यांची स्टाईल फार वेगळी आहे. कोणताही स्टंट करण्याआधी त्यांनी सुरक्षेची काळजी घेतली. हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांत अशा प्रकारची अॅक्शन असली तरीही मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. तसेच स्टंट्स करताना मिळेल त्या साहित्याचा वापर केला असल्याने चित्रपटात तो खरेपणा दिसून येतो.’
चित्रीकरणावेळी श्रेयसला अनेक दुखापतींना सामोरे जावे लागले. याविषयी श्रेयस म्हणाला की, ‘फेब्रुवारी महिन्यात खांद्याला दुखापत झाल्यानंतर डॉक्टरांनी सहा महिने सक्तीची विश्रंती घ्यायला सांगितली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून पुन्हा शूटिंगसाठी मी सज्ज झालो. ऑक्टोबर महिन्यात काही अवघड स्टंट्सचे शूटिंग करायचे होते. त्याची तयारी करण्यासाठी हातात अवघे दोन महिने होते. म्हणून पीळदार देहयष्टी कमावण्यासाठी दररोज आठ पूल अप्स, 15 पुश अप्स आणि 15 सूर्यनमस्कार असा नियमित व्यायाम केला. जोडीला योग्य आहारही होताच.’
‘बाजी’चा दिग्दर्शक निखिल महाजन याच्याशी संवाद साधला असता तो म्हणाला, ‘बाजी’ मराठी मातीतला, मराठी लोकांचा, मराठी भाषेतलाच असल्यामुळे चित्रपटातली अॅक्शनसुद्धा त्याप्रमाणोच आहे. बाजी हा काही सुपर नॅचरल पॉवर असणारा, हवेत उडणारा, गायब होणारा असा सुपरहीरो नसून गावक:यांच्या रक्षणासाठी लढणारा आहे. त्यामुळे प्रेक्षकांना तो आपल्यातलाच एक वाटेल. चित्रपटात श्रेयसने फार मेहनत घेतली तसेच त्याला अनेक शारीरिक दुखापतींनादेखील सामोरे जावे लागले. मात्र त्याची जिद्द आणि इच्छाशक्ती आम्हा सर्वानाच प्रेरणादायी ठरला.’
‘बाजी’मधील सर्व स्टंट्सचे दिग्दर्शन दाक्षिणात्य सुप्रसिद्ध स्टंटमन सिलव्हा यांनी केले आहे. याबाबत श्रेयस म्हणाला, ‘सिलव्हा यांची स्टाईल फार वेगळी आहे. कोणताही स्टंट करण्याआधी त्यांनी सुरक्षेची काळजी घेतली. हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांत अशा प्रकारची अॅक्शन असली तरीही मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे.’