साजीदच्या आगामी चित्रपटात गुरमित

By Admin | Updated: June 25, 2014 23:42 IST2014-06-25T23:42:58+5:302014-06-25T23:42:58+5:30

लोकप्रिय टीव्ही कलाकारांना चित्रपटात संधी देण्याचा एक ट्रेंडच जणू बॉलीवूडमध्ये आला आहे. करण जोहरनंतर आता साजीद खानही याच वाटेवर आहे.

In the upcoming film of Sajid, Gurmeet | साजीदच्या आगामी चित्रपटात गुरमित

साजीदच्या आगामी चित्रपटात गुरमित

>लोकप्रिय टीव्ही कलाकारांना चित्रपटात संधी देण्याचा एक ट्रेंडच जणू बॉलीवूडमध्ये आला आहे. करण जोहरनंतर आता साजीद खानही याच वाटेवर आहे. बहुतेक वेळा फक्त स्टार्ससोबत चित्रपट करणारा साजीद यावेळी टीव्ही स्टार गुरमित चौधरीला त्याच्या चित्रपटात संधी देणार असल्याची चर्चा आहे. साजीदचा हमशकल्स नुकताच रिलीज झाला आहे, तोच त्याने आगामी चित्रपटाची तयारीही सुरू केली आहे. तसे पाहता गुरमितची सध्या बॉलीवूडमध्ये मागणी वाढली आहे. नुकतेच त्याने भट्ट कँपचे तीन चित्रपट साईन केले आहेत. विनोदी चित्रपटांसाठी साजीद खान ओळखला जातो; पण प्रश्न हा पडतो की, टीव्हीवर नेहमीच गंभीर भूमिका साकारणा:या गुरमितला प्रेक्षक विनोदी भूमिकेत स्वीकारतील का?

Web Title: In the upcoming film of Sajid, Gurmeet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.