‘हे’ आहेत बॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिश कपल्स

By Admin | Updated: April 3, 2017 03:19 IST2017-04-03T03:19:59+5:302017-04-03T03:19:59+5:30

ग्लॅमर, उद्योग अन् फॅशनच्या जगतात वावरत असताना तुमची ‘स्टाइल’च तुमचे व्यक्तिमत्त्व ठरवित असते.

'These' are Bollywood's most stylish couples | ‘हे’ आहेत बॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिश कपल्स

‘हे’ आहेत बॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिश कपल्स

ग्लॅमर, उद्योग अन् फॅशनच्या जगतात वावरत असताना तुमची ‘स्टाइल’च तुमचे व्यक्तिमत्त्व ठरवित असते. प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो. नुकतेच शाहीद आणि मीराला एका अ‍ॅवॉर्ड सोहळ्यात ‘स्टायलिश कपल’ या अ‍ॅवॉर्डने गौरविण्यात आले. शाहीद आणि मीराप्रमाणे बॉलिवूडमध्ये अनेक स्टायलिश कपल्स आहे घेऊ या त्यांच्या स्टायलचा आढावा.
शाहीद आणि मीरा
शाहीद आणि मीराची राजपूतचे कपल हे अनेकांचे आवडती जोडी आहे. सगळ्या पार्टीच्या ठिकाणी शाहीद मीरासोबतच हजेरी लावतो. रेड कार्पेटवर तर शाहीद आणि मीरा आपल्या स्टायलिश अंदाजात हजेरी लावत अनेकांच्या नजरा खिळवून ठेवतात.
शाहरूख खान आणि गौरी
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरीला सगळ्यात स्टायलिश आणि वेल ड्रेस्ट कपल समजले जाते. शाहरूख आणि गौरी नेहमीच त्यांच्या बोल्ड अँड डॅशिंग अंदाजात बघायला मिळतात.
सैफअली खान आणि करिना कपूर
नवाब पतौडी खान आणि त्यांची बेगम अर्थात करिना कपूर आपल्या रॉयल अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असतात. सैफ आणि करिना नेहमीच्या आपल्या स्टायलबाबत नेहमीच जागरुक दिसतात. पार्टी आणि सार्वजनिक ठिकाणी ते आपल्या खास नवाबी अंदाजात हजेरी लावतात. बॉलिवूडमधले सैफ आणि करिना हे सगळ्यात हॉट कपल आहे.

Web Title: 'These' are Bollywood's most stylish couples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.