Join us

"मला आशा आहे मी पुन्हा ताकदीने उभी राहीन"; जुई गडकरीच्या नवीन पोस्टमुळे चाहत्यांना चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 13:35 IST

जुलै महिना माझ्यासाठी खूप कठीण होता अशी पोस्ट केल्याने अभिनेत्रीच्या चाहत्यांना चिंता लागून राहिली आहे. काय घडलंय नेमकं?

जुई गडकरी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. जुईला आपण विविध मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. जुईने 'पुढचं पाऊल' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. जुई सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अपडेट्स शेअर करताना दिसते. जुईने सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. काय म्हणाली जुई? जाणून घ्या.

जुलै महिना जुईसाठी कठीण

जुईने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यात ती लिहिते. "जुलै, तू खूप कठीण होतास. तू अनपेक्षित होतास, याच महिन्यात मला खूप मोठा धडा मिळाला, तू मला तोडलंस, याच महिन्यात माझ्या डोळ्यात पाणी आलं, मला आशा आहे की, मी पुन्हा ताकदीने उभी राहीन." अशाप्रकारे जुई गडकरीने खुलासा केला. जुईच्या या पोस्टमुळे चाहत्यांना चिंता लागून राहिली आहे. जुलै महिन्यात वैयक्तिक आयुष्यात जुईच्या आयुष्यात काय घटना घडलीये, याचा अंदाज चाहते लावत आहेत. जुईने मात्र स्पष्टपणे याविषयी खुलासा केला नाहीये. 

ठरलं तर मग विषयी जुई काय म्हणाली

जुई गडकरीने काही तासांपूर्वी पोस्ट शेअर करत कोणत्याही ठरलं तर मग विषयी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि मालिका बघत राहा,अशी विनंती चाहत्यांना केली आहे. तिनं पोस्टमध्ये लिहलं, "मालिकेत लीप येणार नाही आणि मालिका संपणार सुद्धा नाहीये. त्यामुळे युट्यूबवरून कृपया अशा खोट्या बातम्या पसरवू नका. सोशल मीडिया पेजेसला सुद्धा हीच विनंती आहे की, कृपया अफवा पसरवू नका", असं म्हटलं. 

पुढे तिनं लिहलं, "मालिका सुरूच राहील आणि आता प्रेक्षकांसमोर हळुहळू एक-एक गोष्ट उलगडत जाणार आहे. अजून बऱ्याच गोष्टींचा खुलासा होणं बाकी आहे. फक्त 'वात्सल्य आश्रम' केसचा निकाल लागला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, मालिका रोज बघत राहा. 'ठरलं तर मग' मालिकेच्या संपूर्ण टीमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आम्ही कायम कृतज्ञ आहोत", असं तिनं म्हटलं.

टॅग्स :जुई गडकरीबॉलिवूडमराठी चित्रपटमराठी अभिनेताटिव्ही कलाकारटेलिव्हिजन