स्वप्निल-सचितच्या ‘फ्रेंड्स’चे शोले २२ जानेवारीला भडकणार
By Admin | Updated: October 24, 2015 02:30 IST2015-10-24T02:30:51+5:302015-10-24T02:30:51+5:30
स्वप्निल जोशी आणि सचित पाटील ही मराठीतील ग्लॅमरस जोडी. चॉकलेट बॉय म्हणून फेमस. ‘फ्रेंड्स’ या चित्रपटातून हे दोघे एकत्र येणार आहेत. चित्रपटाच्या पोस्टरवरून अगदी

स्वप्निल-सचितच्या ‘फ्रेंड्स’चे शोले २२ जानेवारीला भडकणार
स्वप्निल जोशी आणि सचित पाटील ही मराठीतील ग्लॅमरस जोडी. चॉकलेट बॉय म्हणून फेमस. ‘फ्रेंड्स’ या चित्रपटातून हे दोघे एकत्र येणार आहेत. चित्रपटाच्या पोस्टरवरून अगदी ‘शोले’मधील जय-वीरूच्या रूपाने जुळलेली अमिताभ-धर्मेंद्रसारखी त्यांची केमिस्ट्री या चित्रपटात जुळणार आहे. हा चित्रपट २२ जानेवारीला बॉक्स आॅफिसवर झळकणार आहे.
दुनियादारी, मुंबई-पुणे-मुंबई, मितवा, तू ही रे अशा बॉक्स आॅफिसवर करोडोंचा गल्ला जमवलेल्या चित्रपटांचा अभिनेता स्वप्निल जोशी याच्या वाढदिवशी ‘फ्रेंड्स’चे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
या चित्रपटाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा फ्रेशनेस. अगदी पोस्टरवरूनही तो जाणवत आहे. विशेष म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटांची भव्यताही या चित्रपटाला लाभली आहे. याचे कारण म्हणजे दक्षिण सिनेमाचे प्रसिद्ध दिग्दर्शक आर. मधेश यांनी या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनातून मराठी सिनेमात पदार्पण केलं आहे. ही दाक्षिणात्य भव्यता आणि स्वप्निल- सचित यांच्या संवादाची जादू यामुळे हा चित्रपट ही प्रेक्षकांसाठी मेजवानीच असेल, हे वेगळे सांगायला नको.
ब्ल्यू आय आटर््सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यामध्ये संजय केलापुरे, मनीष चंदा, प्रेम व्यास निर्माते असून जीसिम्सचे कार्तिक निशानदार आणि अर्जुन बर्हानदेखील सहभागी आहेत.