‘राजवाडे अॅण्ड सन्स’च्या बदलत्या कुटुंबाची कहाणी
By Admin | Updated: September 26, 2015 00:55 IST2015-09-26T00:55:50+5:302015-09-26T00:55:50+5:30
प्रत्येक अभिनेत्याचे स्वत:चाच चित्रपट निर्मिती करण्याचे एक स्वप्न असते, अभिनेता अतुल कुलकर्णी देखील त्याला अपवाद नाही, सोलापूरमधल्या बिझनेस कुटुंबामधला असूनसुद्धा

‘राजवाडे अॅण्ड सन्स’च्या बदलत्या कुटुंबाची कहाणी
प्रत्येक अभिनेत्याचे स्वत:चाच चित्रपट निर्मिती करण्याचे एक स्वप्न असते, अभिनेता अतुल कुलकर्णी देखील त्याला अपवाद नाही, सोलापूरमधल्या बिझनेस कुटुंबामधला असूनसुद्धा अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. मात्र आता स्वत:च्या ‘कॅफे कमेरा’ या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून ‘राजवाडे अॅन्ड सन्स’ची निर्मिती ते करीत आहेत. या निर्मितीच्या क्षेत्रातील पदार्पणाविषयी अतुल कुलकर्णी ‘सीएनएक्स’शी बोलताना सांगतात, सुरुवातीपासून चित्रपट निर्मितीमध्ये माझा नेहमीच रस होता. अनेक भाषांमध्ये काम करताना त्यांच्या निर्मिती प्रक्रिया आणि पद्धतीबद्दल जास्तीत जास्त जाणून घेत गेलो. त्यानंतर चित्रपटाच्या व्यवस्थापनामध्ये शिरावं, असे वाटले. ‘राजवाडे अॅन्ड सन्स’ ही बिझनेस व्यवसाय असलेल्या तीन पिढ्यांची गोष्ट आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करणाऱ्या या चित्रपटात सर्वांना जे करायचे आहे ते करायला मिळत आहे. एका बदलत्या कुटुंबाची ही कहाणी आहे. येत्या १६ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाकडे दर्दि रसिकांचे लक्ष वेधणार आहे.