‘विशेष’ भूमिकांनाही लाभले ग्लॅमर!

By Admin | Updated: January 9, 2016 02:52 IST2016-01-09T02:52:12+5:302016-01-09T02:52:12+5:30

बॉलीवूडच्या अनेक मोठ्या स्टार्सनी शारीरिक वा मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीची भूमिका साकारली आहे. काल प्रदर्शित झालेल्या वजीर या चित्रपटातही अमिताभ बच्चन यांनीसुद्धा अपंगाची भूमिका केली आहे

'Special' roles also got glamor! | ‘विशेष’ भूमिकांनाही लाभले ग्लॅमर!

‘विशेष’ भूमिकांनाही लाभले ग्लॅमर!

बॉलीवूडच्या अनेक मोठ्या स्टार्सनी शारीरिक वा मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीची भूमिका साकारली आहे. काल प्रदर्शित झालेल्या वजीर या चित्रपटातही अमिताभ बच्चन यांनीसुद्धा अपंगाची भूमिका केली आहे. विशेष म्हणजे, या सर्व स्टार्सनी आपल्या अलौकिक अभिनयाच्या बळावर या भूमिकांना एक वेगळे वलय प्राप्त करून दिले आहे. या स्टार्सच्या संवेदनशील अभिनयामुळे या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील यात काहीच शंका नाही. अशाच काही गाजलेल्या भूमिकांचा हा आढावा खास वजीरच्या निमित्ताने येथे देत आहोत.
ब्लॅक
संजय लीला भन्सालीच्या या चित्रपटात राणी मुखर्जी व अभिताभ बच्चनची मुख्य भूमिका असून यात राणी (मिशेल मक्नल्ली) जन्मापासून आंधळी असते. यात तिचे भाव कोणी समजू शकत नसल्याने ती अनेकदा हिंसक होते. या भूमिकेचे राणीने खरेच सोने केले. हावभावातून तिने जो हृदयस्पर्शी संवाद साधला तो थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडला. तिच्या या भूमिकेसाठी राणीला उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारही मिळाला होता.
गुजारिश
‘हूज लाइफ इज इट एनीवे’ आणि ‘द सी इनसाइड’ने प्रेरित व संजय लीला भन्सालीद्वारा दिग्दर्शित ‘गुजारिश’ चित्रपटात एथेन मैस्केरेहास (हृतिक रोशन) नावाच्या जादूगाराची कथा आहे. ज्यात तो क्वाड्रोप्लेजिया नावाच्या आजाराने ग्रस्त असतो. या आव्हानात्मक पात्राला हृतिकने पडद्यावर अगदी ताकदीने उभे केले. यात हृतिकला फक्त चेहऱ्याद्वारेच अभिनय करायचा होता. ‘गुजारिश’ हा त्याच्या करिअरमधील माईलस्टोन समजला जातो.
बर्फी
या चित्रपटात रणबीर कपूरने मूक-बधिराची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाने विशेष दाद मिळविली. यात त्याची जोडी प्रियांका चोप्रा (झिलमिल) सोबत असून दोघेही असामान्य आजाराने ग्रस्त असतात. या चित्रपटात नाते व संवेदना मुख्य भूमिकेत आहेत आणि तिथे आजारपण आडवे येत नाही. इतर अनेक चित्रपटांत मस्तीखोर युवकाची भूमिका साकारणाऱ्या रणबीरने यात कमालीचा अभिनय केला आहे.
सदमा
बालू महेंद्रच्या दिग्दर्शनातील १९८३ मध्ये आलेल्या ‘सदमा’मध्ये लक्ष्मी (श्रीदेवी) एका सहा वर्षांच्या मुलीच्या भूमिकेत दिसते. एका अपघातात ती जखमी होऊन कोेमात जाते व शुद्धीवर आल्यानंतर तिला काहीच आठवत नाही. आणि ती सहा वर्षांच्या मुलीप्रमाणे वागू लागते. श्रीदेवीला हा अभिनय सादर करताना खूप आव्हनांना तोंड द्यावे लागले होते. पण, तिने ही भूमिका अजरामर करून टाकली.

Web Title: 'Special' roles also got glamor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.