Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही वेगळे झालो आहोत..."; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १६ वर्षांचं नातं संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 16:56 IST

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची घोषणा केली आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोट घेतल्याची बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे श्रीनंदा शंकर. प्रसिद्ध नृत्यांगना तनुश्री शंकर यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रीनंदा हिने पती गेव्ह सातारवाला याच्यापासून घटस्फोट घेत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. गेल्या १६ वर्षांपासून एकत्र असलेल्या या जोडीने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून, श्रीनंदाने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

घटस्फोटाची अधिकृत घोषणा:

२१ डिसेंबर २०२५ रोजी श्रीनंदाने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट केली. त्यात तिने म्हटले की, "गेल्या काही दिवसांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि वैवाहिक संबंधांबद्दल ज्या अफवा पसरत होत्या, त्या दुर्दैवाने खऱ्या आहेत. आम्ही काही काळापूर्वीच वेगळे झालो होतो, परंतु हे सार्वजनिक करण्यापूर्वी आम्हाला स्वतःला थोडा वेळ हवा होता." जरी तिने घटस्फोटाचे नेमके कारण स्पष्ट केले नसले तरी, हा निर्णय दोघांनी विचारपूर्वक आणि संमतीने घेतल्याचे नमूद केले.

श्रीनंदा आणि गेव्ह यांची भेट सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. जवळपास ५ वर्षे ते दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले. पुढे २००९ मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्न केलं. १६ वर्षांच्या संसार अनुभवल्यानंतर त्यांनी आता घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

श्रीनंदाने आपल्या चाहत्यांना आणि माध्यमांना या कठीण काळात तिच्या खासगीपणाचा आदर करण्याची विनंती केली आहे. तिने स्पष्ट केले की, या विषयावर ती किंवा तिची आई तनुश्री शंकर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाहीत. "माझे सोशल मीडियावरील कंटेन्ट क्रिएशनचे काम सुरूच राहील." असेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. श्रीनंदा शंकरने अनेक बंगाली चित्रपटांत काम केले असून ती एक यशस्वी मॉडेल आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Actress Sreenanda Shankar announces divorce, ending 16-year relationship.

Web Summary : Actress Sreenanda Shankar, daughter of Tanushree Shankar, announced her divorce from Gave Saatara. After 16 years together, they decided to separate with mutual consent. Sreenanda shared an emotional post, requesting privacy. She will continue her social media work and content creation.
टॅग्स :घटस्फोटलग्नबॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकार