‘चीटर’साठी सोनूचे डबल रेकॉर्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2016 01:03 AM2016-06-02T01:03:01+5:302016-06-02T01:03:01+5:30

सोनू निगमने आजवर बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अनेक गाणी गाऊन त्याच्या आवाजाने प्रेक्षकांना मोहिनी घातली आहे. कोणत्याही प्रकारचे गाणे अगदी सहजतेने गाणाऱ्या या सिंगरने

Sonu's double recording for 'Cheater' | ‘चीटर’साठी सोनूचे डबल रेकॉर्डिंग

‘चीटर’साठी सोनूचे डबल रेकॉर्डिंग

googlenewsNext

सोनू निगमने आजवर बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अनेक गाणी गाऊन त्याच्या आवाजाने प्रेक्षकांना मोहिनी घातली आहे. कोणत्याही प्रकारचे गाणे अगदी सहजतेने गाणाऱ्या या सिंगरने आता मराठी ‘चीटर’ या सिनेमासाठी पार्श्वगायन केले आहे. सोनू निगमने पूजा सावंत अन् वैभव तत्त्ववादी यांच्यावर चित्रित करण्यात आलेले ‘मन माझे’ हे रोमँटिक गाणे गायले आहे. हे गाणे त्याने एकदा नाही, तर तब्बल दोन वेळा गायले आहे. आता सोनु निगमसारख्या सिंगरला जर एकच गाणे दोनदा गायला लागले, असे ऐकल्यावर प्रेक्षकांच्या भुवया तर उंचावल्याच असतील. या गाण्यात असे काय आहे, की सोनूला ते एकदा गायला जमले नाही? अशा प्रकारचे प्रश्न जर पडत असतील तर जरा थांबा. सोनूने गायलेले गाणे हे अतिशय उत्कृष्ट होते; परंतु जेव्हा सोनूने ते पाहिले तेव्हा त्याला वाटले, आपण हे गाणे अजून जास्त चांगले गाऊ शकतो अन् त्याने ते पुन्हा रेकॉर्डिंग केले. हे जेव्हा वैभव तत्त्ववादीला समजले तेव्हा तो थोडासा घाबरला. त्याला वाटले, की आपण चांगले एक्स्प्रेशन दिले नाही म्हणूनच सोनूला हे गाणे डबल गावे लागत आहे. परंतु, त्याचे खरे कारण असे होते, की या गाण्यात वैभवने केलेले लिप्सिंग जेव्हा सोनूने पाहिले, तेव्हा त्याने वैभवच्या लिप्सिंगला मॅच करता यावे, यासाठी डबल गाणे गायले. क्या बात है सोनू! याला म्हणतात, डाऊन टु अर्थ सिंगर.

Web Title: Sonu's double recording for 'Cheater'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.