सोनमची विचित्र अडचण

By Admin | Updated: June 25, 2014 23:49 IST2014-06-25T23:49:25+5:302014-06-25T23:49:25+5:30

‘रांझना’ आणि ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाच्या यशानंतर सोनम कपूरच्या करिअरने आता वेग धरला आहे.

Sonam's strange problem | सोनमची विचित्र अडचण

सोनमची विचित्र अडचण

>‘रांझना’ आणि ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाच्या यशानंतर सोनम कपूरच्या करिअरने आता वेग धरला आहे. सध्या सोनम ही खान ब्रदर्सची खास बनली आहे. अरबाजनिर्मित ‘डॉली की डोली’मध्ये ती मुख्य भूमिकेत आहे. सूरज बडजात्या यांच्या चित्रपटात सोनम सलमानची हिरोईन आहे. याआधी तिने सलमानसोबत ‘साँवरिया’ या चित्रपटात अभिनय केला होता. हे दोन्ही चित्रपट एकापाठोपाठच करायचे असल्याने सध्या एका विचित्र अडचणीत सोनम सापडली आहे. ही अडचण तिच्या वजनाशी संबंधित आहे. ‘डॉली की डोली’मध्ये ती ‘पंजाबी कुडी’ बनली आहे. त्यामुळे तिला वजन वाढवायला सांगण्यात आले आहे. वजन वाढवणारे पदार्थ खाऊन सोनमने तिचे वजन वाढवले आहे. आता प्रेम रतन धन पायोचे शूटिंग सुरू होत आहे. त्यामुळे सोनमला जवळपास सहा ते आठ किलो वजन कमी करावे लागणार आहे.

Web Title: Sonam's strange problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.