लंडनला असतो सोनमचा बॉयफ्रेंड!

By Admin | Updated: January 18, 2017 03:02 IST2017-01-18T03:02:13+5:302017-01-18T03:02:13+5:30

बॉलिवूडची ‘फॅशनिस्टा’ म्हणून प्रसिद्ध असलेली सोनम तिच्या पे्रमजीवनासाठीसुद्धा चर्चेत आहे.

Sonam's boyfriend is in London! | लंडनला असतो सोनमचा बॉयफ्रेंड!

लंडनला असतो सोनमचा बॉयफ्रेंड!


बॉलिवूडची ‘फॅशनिस्टा’ म्हणून प्रसिद्ध असलेली सोनम तिच्या पे्रमजीवनासाठीसुद्धा चर्चेत आहे. सोनमचा तो ‘रहस्यमयी’ बॉयफ्रेंड कोण आहे हा प्रश्न मीडिया आणि चाहत्यांना पडला आहे.अखेर ही ‘मिस्ट्री’ अंशत: का होईना पण सुटली. वादग्रस्त सेलिब्रेटी शो ‘कॉफी विथ करण’वर सोनमने तिच्या प्रेमाची पहिल्यांदाच जाहीर कबुली दिली. होस्ट करणने शाब्दिक खेळ करून तिला कबुली देण्यास भागच पाडले. सोनमचा बॉयफ्रेंड लंडनस्थित आहे एवढी माहिती या शोमध्ये मिळाली. करिना कपूरसोबत आलेल्या सोनमला करणने तिच्या बॉयफ्रेंडविषयी विचारले असता तिने यावर भाष्य करणे टाळले. ती बोलत नसल्याचे पाहून करणने प्रश्नाला थोडे फिरवून विचारले की, तुझे आणि लंडनस्थित एका व्यवसायिकाचे प्रेम असल्याची खूप चर्चा आहे. त्याविषयी काय सांगशील? यावर सोनमला गप्प राहता आले नाही. ती म्हणाली की, मी दीर्घकाळापासून या लंडनस्थित व्यवसायिकाला डेट करीत आले आहे. त्याचे नाव तर मी घेणार नाही पण एवढे मात्र नक्कीच सांगेन की, मला माझे खासगी आयुष्यावर सार्वजनिकरीत्या बोलायला आवडत नाही. कारण मला खूप भीती वाटते. माझे प्रेमजीवन ही माझी अत्यंत खासगी बाब असून मला ती तशीच ठेवायची आहे. त्यामुळे मी याविषयावर जास्त बोलणे टाळते. गेल्या काही दिवसांपासून सोनम आणि आनंद आहुजा यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. मध्यंतरी त्यांच्या साखरपुड्याचीसुद्धा बातमी आली होती. सोनमने हातात अंगठी घातलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. अनेक कार्यक्रमांमध्ये ते एकत्रच सहभागी होतात. नववर्षामध्ये तर आनंद सोशल मीडियावर केवळ सोनमसोबतचे फोटो आणि व्हिडिओज शेअर करीत आहे. सोनमसुद्धा प्रेमाचे संकेत देणारे फोटो अपलोड करत असते. मागच्या महिन्यात पापा अनिल कपूर यांच्या ६०व्या वाढदिवसाच्या पार्टीतही आनंद सहभागी झाला होता. तेव्हापासूनच त्यांच्या नात्याची कुजबुज इंडस्ट्रीमध्ये सुरू झाली होती.

Web Title: Sonam's boyfriend is in London!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.