सिद्धार्थसोबत दिसणार सोनाक्षी
By Admin | Updated: July 25, 2014 00:35 IST2014-07-25T00:35:48+5:302014-07-25T00:35:48+5:30
बॉलीवूडमध्ये सध्या नव्या जोडय़ांना कास्ट करण्याकडे दिग्दर्शक ांचा कल असतो, कारण नव्या जोडय़ा प्रेक्षकांनाही आकर्षित करत असतात.

सिद्धार्थसोबत दिसणार सोनाक्षी
बॉलीवूडमध्ये सध्या नव्या जोडय़ांना कास्ट करण्याकडे दिग्दर्शक ांचा कल असतो, कारण नव्या जोडय़ा प्रेक्षकांनाही आकर्षित करत असतात. दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणीच्या भावेश जोशी या चित्रपटासाठी सिद्धार्थ मल्होत्रला साईन करण्यात आले आहे. या चित्रपटात सिद्धार्थसोबत सोनाक्षीला साईन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या चित्रपटाची स्क्रिप्ट सोनाक्षीलाही आवडली असून, लवकरच ती दिग्दर्शकाशी चर्चा करणार आहे. यापूर्वी सोनाक्षी विक्रमादित्यच्या ‘लुटेरा’मध्ये दिसली होती. चित्रपट चालला नसला, तरी अभिनेत्री म्हणून सोनाक्षीची खूप प्रशंसा झाली. त्यामुळे ती हा चित्रपट नाकारण्याच्या शक्यता कमी आहेत.