सोनू साकारणार दारा सिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2017 04:11 IST2017-02-11T04:11:29+5:302017-02-11T04:11:29+5:30

अभिनेता सोनू सूद याचा ‘कुंग फू योगा’ हा चित्रपट भारतात फारसे यश मिळवू शकला नसला तरीदेखील चीनमध्ये या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे.

Sona will make Dara Singh! | सोनू साकारणार दारा सिंग!

सोनू साकारणार दारा सिंग!

अभिनेता सोनू सूद याचा ‘कुंग फू योगा’ हा चित्रपट भारतात फारसे यश मिळवू शकला नसला तरीदेखील चीनमध्ये या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. सोनूने आपल्या आगामी चित्रपटाची तयारी सुरू केली असून, त्याचा पुढील चित्रपट हा बायोपिक असेल. अभिनेता, पैलवान व हिंद केसरी दारासिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची तयारी सोनू सूद याने चालविली आहे.
याविषयी सोनू म्हणाला, ‘माझा आगामी चित्रपट बायोपिक असेल व त्यासाठी मी तयारीला लागलो आहे.’ सोनू आपल्या आगामी चित्रपटाबद्दल माहिती देताना म्हणाला, ‘मला वाटते बायोपिकमध्ये काम करणे रोमांचक अनुभव असतो. एखाद्या व्यक्तीने जगलेले आयुष्य पडद्यावर साकारणे कठीण काम आहे. मला आठवते, माझा पहिला भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित ‘शहीद-ए-आझम’ हा बायोपिक होता. यासाठी आम्ही त्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांना भेटलो होतो. आम्हाला बायोपिकसाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात.’ सोनू सूदने आगामी चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Sona will make Dara Singh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.