श्रुती हसनवर सुरेश रैना फिदा

By Admin | Updated: July 21, 2014 14:53 IST2014-07-21T14:49:04+5:302014-07-21T14:53:00+5:30

सुरेश रैनाचे अभिनेत्री श्रुती हसनवर प्रेम जडले आहे. मात्र, अद्याप दोघांनी आपल्या नात्याचा होकार दिला नाही

Shruti Hasanwan Suresh Raina Fida | श्रुती हसनवर सुरेश रैना फिदा

श्रुती हसनवर सुरेश रैना फिदा

>विराट कोहलीसोबत इंग्लंडमध्ये इंडियन टीमच्या हॉटेलात अनुष्का शर्मा थांबल्यामुळे कोहली-अनुष्काच्या प्रेमाची चर्चा जोरात सुरू असताना आता भारतीय संघातील आणखी एक खेळाडू एका हिरोईनच्या प्रेमात पडला आहे. हा धुवाँधार क्रिकेटर सुरेश रैना आहे. सुरेश रैनाचे अभिनेत्री श्रुती हसनवर प्रेम जडले आहे. मात्र, अद्याप दोघांनी आपल्या नात्याचा होकार दिला नाही. त्यांचे लपूनछपून चाललेले प्रेम अनेकांच्या नजरेस पडले आहे. दोघांच्या जवळील सूत्रांचे म्हणणे आहे की, आतच कुठे यांच्या नात्याला सुरुवात झाली आहे. सध्या ते दोघे आपल्या रिलेशनशिपला मीडियासमोर जाहीर करू इच्छित नाहीत. रैना सध्या भारतीय संघातील टॉप खेळाडू आहे, तर श्रुती हसन चित्रपटसृष्टीत आपली जागा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. त्या दोघांच्या प्रेमामुळे यांच्या करिअरमध्ये अडथळा निर्माण होऊ नये याची खबरदारी ते घेत आहेत.
 

Web Title: Shruti Hasanwan Suresh Raina Fida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.