श्रेया विवाहबंधनात
By Admin | Updated: February 6, 2015 23:50 IST2015-02-06T23:50:19+5:302015-02-06T23:50:19+5:30
गेली कित्येक वर्षे आपल्या सुमधुर आवाजाने गायिका श्रेया घोषालने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. गाण्यांव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्याची फारशी चर्चा झाली नाही.

श्रेया विवाहबंधनात
गेली कित्येक वर्षे आपल्या सुमधुर आवाजाने गायिका श्रेया घोषालने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. गाण्यांव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्याची फारशी चर्चा झाली नाही. मात्र इंटरनेटवरून आपण लग्न केल्याचे सांगत तिने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. गुरुवारी श्रेयाचे प्रियकर शिलादित्य मुखोपाध्यायसोबत लग्न झाले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह बंगाली पद्धतीने पार पडला. तिने इंटरनेटवर लग्नातला फोटो शेअर करीत चाहत्यांकडून शुभेच्छाही मागितल्या.