शाहरुख बनणार ध्यानचंद?
By Admin | Updated: June 25, 2014 23:47 IST2014-06-25T23:47:25+5:302014-06-25T23:47:25+5:30
शाहरुख खानचे हॉकीप्रेम जगजाहीर आहे. त्याने त्याच्या महाविद्यालयीन जीवनात हॉकी संघाचे नेतृत्व केले होते.

शाहरुख बनणार ध्यानचंद?
>शाहरुख खानचे हॉकीप्रेम जगजाहीर आहे. त्याने त्याच्या महाविद्यालयीन जीवनात हॉकी संघाचे नेतृत्व केले होते. या हॉकी प्रेमामुळेच त्याने शिमित अमीनचा ‘चक दे’ हा चित्रपट केला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला. हॉकीचे जादूगर अशी ओळख असलेले महान हॉकी खेळाडू ध्यानचंद यांच्या जीवनावर चित्रपट बनवला जाणार असल्याची बातमी असून त्यात शाहरुख ध्यानचंद यांच्या भूमिकेत असल्याचे सांगण्यात येत आहे. ही बातमी शाहरुखर्पयतही पोहोचली असून असा कोणताही चित्रपट करणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे अशा चित्रपटाची ऑफरच आली नसल्याचे त्याने म्हटले आहे. हा चित्रपट कोण बनवत आहे, हे ही शाहरुखला माहीत नाही. त्यानेही ही बातमी वर्तमानपत्रत वाचली आहे.