शाहीद-आलिया ठरले सपशेल अपयशी

By Admin | Published: October 27, 2015 01:34 AM2015-10-27T01:34:45+5:302015-10-27T01:34:45+5:30

दिग्दर्शक विकास बहल यांचा शानदार हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा प्रभाव दाखवू शकला नाही. शाहिद कपूर आणि आलिया भट्ट यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारल्याचे दिसून येत आहे.

Shahid-Aliya proved to be unsuccessful | शाहीद-आलिया ठरले सपशेल अपयशी

शाहीद-आलिया ठरले सपशेल अपयशी

googlenewsNext

दिग्दर्शक विकास बहल यांचा शानदार हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा प्रभाव दाखवू शकला नाही. शाहिद कपूर आणि आलिया भट्ट यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारल्याचे दिसून येत आहे. पहिल्या चार दिवसांत या चित्रपटाने ३० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज झाला होता. पहिल्या दिवशी १३ कोटी रुपयांच्या ओपनिंगसह चित्रपटाने अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, दुसऱ्या दिवसापासून व्यवसाय कमी होत गेला. ५० कोटींपेक्षा जास्त बजेटच्या या चित्रपटाने अपेक्षाभंग केलेला आहे. चार दिवसांच्या प्रतिसादावरून या क्षेत्रातील तज्ज्ञ या चित्रपटाला या वर्षातील निराशा करणारा चित्रपट म्हणून संबोधत आहेत. शाहिद कपूरच्या करिअरसाठीही हा चित्रपट महत्त्वाचा म्हणून चर्चिला जात होता. पण, अपेक्षा आणि मोठे दावे फोल ठरवत प्रेक्षकांनी या चित्रपटाला नाकारले आहे. यापूर्वीच्या चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर प्यार का पंचनामाची सुरुवात चांगली झाली. या चित्रपटाने २२ कोटींच्या वीकेंडसह बंपर ओपनिंग केली होती. दुसऱ्या वीकेंडपर्यंत बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाचा करिश्मा कायम
राहिला. दहा दिवसांत या चित्रपटाचा व्यवसाय ४४ कोटी रुपये झाला आहे. या वर्षातील सरप्राइज चित्रपट म्हणून प्यार का पंचनामाकडे पाहिले जात आहे.
वेडिंग पुलाव चित्रपट तर रिलीज झाल्याच्या दिवशीच बॉक्स आॅफिसच्या स्पर्धेतून बाहेर गेला होता. संजय गुप्तांच्या जज्बामधून ऐश्वर्या रायचे पुनरागमन झाले खरे; पण हा चित्रपटही प्रभाव दाखवू शकला नाही. तिसऱ्या आठवड्यापर्यंत चित्रपटाने २४ कोटींचा व्यवसाय केला आहे. अक्षय कुमारच्या सिंग इज ब्लिंगने ८८ कोटींचा व्यवसाय केला असून मेघना गुलजार यांच्या तलवारने २९ कोटींपर्यंत मजल मारली आहे.
येत्या शुक्रवारी कोणताही मोठा चित्रपट रिलीज होणार नाही. मात्र, छोट्या बॅनरचे चित्रपट येत आहेत. कुणाल खेमू यांचा गुड्डू की गन, दिबाकर बॅनर्जी यांचा तितली आणि रणदीप हुड्डा यांचा मै और चार्ल्स यासह गँगस्टार आॅफ बिहार हे चित्रपट रिलीज होणार आहेत.

Web Title: Shahid-Aliya proved to be unsuccessful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.