डेविल नावाने बनेल ‘किक’चा सिक्वल
By Admin | Updated: December 6, 2014 23:58 IST2014-12-06T23:58:47+5:302014-12-06T23:58:47+5:30
साजीद नादियाडवालाने नुकतेच डेविल या टायटलची नोंदणी करून घेतली आहे. तेव्हापासून हा चित्रपट ‘किक’चा सिक्वल असेल, अशी चर्चा सुरू आहे.

डेविल नावाने बनेल ‘किक’चा सिक्वल
साजीद नादियाडवालाने नुकतेच डेविल या टायटलची नोंदणी करून घेतली आहे. तेव्हापासून हा चित्रपट ‘किक’चा सिक्वल असेल, अशी चर्चा सुरू आहे. ‘किक’मध्ये सलमानने डेविलची भूमिका साकारली होती. त्यामुळे साजीदने याच नावाने सिक्वल बनवण्याचा विचार केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘किक’चा दिग्दर्शक असलेल्या साजीदने नुकतेच स्पष्ट केले आहे की, पुढील तीन- चार वर्षार्पयत तो दिग्दर्शन करणार नाही. त्यामुळे तीन- चार वर्षानंतरच तो या चित्रपटाचा सिक्वल बनवण्याची शक्यता आहे. इतर कोणी या टायटलचा चित्रपट बनवू नये यासाठी त्याने आताच या टायटलची नोंदणी करून घेतली असावी. डेविलचे दिग्दर्शन साजीदऐवजी दुसरा कोणी दिग्दर्शक करण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. सलमान खान या चित्रपटाचा हीरो असेल हे निश्चित; पण अभिनेत्रीची निवड वेळ आल्यावर केली जाईल.