‘हैदर’मध्ये शाहिदचा अभिनय बघून पंकज खुश
By Admin | Updated: July 28, 2014 03:24 IST2014-07-28T03:24:03+5:302014-07-28T03:24:03+5:30
शाहिद कपूरचा आगामी चित्रपट ‘हैदर’चा ट्रेलर लाँच झाला आहे़ त्याला या चित्रपटातील अभिनयासाठी चांगलीच दाद मिळत आहे़

‘हैदर’मध्ये शाहिदचा अभिनय बघून पंकज खुश
शाहिद कपूरचा आगामी चित्रपट ‘हैदर’चा ट्रेलर लाँच झाला आहे़ त्याला या चित्रपटातील अभिनयासाठी चांगलीच दाद मिळत आहे़ त्याच्या या भूमिकेची चर्चा जोरात सुरू आहे़ चित्रपटाची शुटिंग संपवून आता एडिटिंग टेबलवर गेला आहे; परंतु विशाल भारद्वाजने फिडबॅक मिळवण्यासाठी पंकज कपूर समोर एक विशेष स्क्रिनिंग ठेवली होती़ कारण विशाल व पंकजचे मैत्रीचे नाते अतिशय जुने आहे़ शाहिदला कळाल्यावर तो लगेच आपले वडील पंकजकडे फिडबॅक घेण्यासाठी गेला़ पंकज बॉलीवूडमध्ये ४० वर्षांपासून आहे व ते एक अनुभवी कलाकार आहेत.