नर्गिसची प्रशंसा करतोय सलमान
By Admin | Updated: July 24, 2014 01:11 IST2014-07-24T01:11:36+5:302014-07-24T01:11:36+5:30
सलमान खान नवोदित कलाकारांना नेहमीच प्रोत्साहित करीत असतो. त्याने त्याच्या ‘किक’ या चित्रपटात नर्गिस फाखरीला एका गाण्यात काम करण्याची संधी दिली आहे.

नर्गिसची प्रशंसा करतोय सलमान
सलमान खान नवोदित कलाकारांना नेहमीच प्रोत्साहित करीत असतो. त्याने त्याच्या ‘किक’ या चित्रपटात नर्गिस फाखरीला एका गाण्यात काम करण्याची संधी दिली आहे. त्याच्या मते, नर्गिस सुंदर असून ती चांगली डान्सरही आहे. लोकांचे तिच्याबद्दलचे मत चुकीचे आहे. सलमान म्हणाला की, नर्गिसने केलेले नृत्य लाजवाब आहे. मला ती आवडते. ती खूप एनजिर्टिक आहे. माङया मते, या गाण्याचा चित्रपटाला नक्कीच फायदा होईल.’ ‘किक’ या चित्रपटात नर्गिस आणि सलमानवर एक आयटम साँग चित्रित करण्यात आले आहे. हा चित्रपट 25 जुलैला रिलीज होत आहे. चित्रपटात सलमानसह ज्ॉकलीन फर्नाडिस मुख्य भूमिकेत आहे.