गोविंदामुळे रखडला सलमानचा मराठी चित्रपट
By Admin | Updated: August 12, 2015 05:20 IST2015-08-12T05:20:24+5:302015-08-12T05:20:24+5:30
प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला मराठी चित्रपट करण्याची खूप इच्छा होती. त्यासाठी सर्व तयारीही त्याने केली होती. महेश मांजरेकरच्या ‘शिक्षणाच्या आईचा घो’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक

गोविंदामुळे रखडला सलमानचा मराठी चित्रपट
प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला मराठी चित्रपट करण्याची खूप इच्छा होती. त्यासाठी सर्व तयारीही त्याने केली होती. महेश मांजरेकरच्या ‘शिक्षणाच्या आईचा घो’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्याचा त्याचा विचार होता. मराठीमध्ये भरत जाधवने साकारलेल्या बापाच्या भूमिकेसाठी गोविंदाचे नावही निश्चित झाले होते. मात्र, गोविंदाने फार इंटरेस्ट दाखविला नाही. त्यामुळे चित्रपट रखडला, अशी कबुली खुद्द सलमान खानने दिली आहे. गोविंदाने नंतर चित्रपटात काम करण्याची तयारीही दर्शविली. मात्र, तोपर्यंत शिक्षणक्षेत्रात नव्या घडामोडी झाल्याने चित्रपटाच्या विषयाचा रिलेव्हन्सही संपून गेला होता. या चित्रपटाबरोबर ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाच्या रिमेकचाही विचार सलमानच्या मनात आहे.