सलमानचे रागावणे आवडत नाही
By Admin | Updated: December 15, 2014 00:06 IST2014-12-15T00:06:55+5:302014-12-15T00:06:55+5:30
सुपरस्टार सलमान खान हा माझ्यावर फार रागावतो. त्याचे रागावणे मला मुळीच आवडत नाही

सलमानचे रागावणे आवडत नाही
सुपरस्टार सलमान खान हा माझ्यावर फार रागावतो. त्याचे रागावणे मला मुळीच आवडत नाही, असे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सांगितले. विशेष म्हणजे सलमानसोबतच ‘दबंग’ या चित्रपटातून सोनाक्षीने आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला होता. शाहरुख आणि आमिर खान यांच्यातील कोणत्या गोष्टी तुला आवडत नाहीत, अशी विचारणा केली असता, त्या दोघांना मी चांगल्या प्रकारे ओळखत नसल्याने त्यांच्या विषयी सांगणे कठीण असल्याचे उत्तर तिने दिले. शाहरुख आणि आमिर यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. शाहरुख तर बॉलीवूडचा सर्वात हॉट हीरो आहे, अशी पुस्तीही सोनाक्षीने जोडली. खान त्रिकुटाचे यश सर्वार्थाने मोठे आहे. त्यांच्या एवढी उंची गाठणे इतरांना कठीणच असल्याचे सांगून ती म्हणाली की, सलमान आणि शाहरुखसारखे स्टारडम मिळवणे आजच्या पिढीतील कलावंतांसाठी अशक्यप्राय बाब आहे.