सचिन देणार रसिकांना ‘गुलाबजाम’
By Admin | Updated: April 3, 2017 03:17 IST2017-04-03T03:17:17+5:302017-04-03T03:17:17+5:30
काही दिवसांपूर्वीच गुलाबजामून नावाच्या हिंदी सिनेमाची घोषणा दिग्दर्शक अनुराग कश्यपने केली

सचिन देणार रसिकांना ‘गुलाबजाम’
काही दिवसांपूर्वीच गुलाबजामून नावाच्या हिंदी सिनेमाची घोषणा दिग्दर्शक अनुराग कश्यपने केली होती. विशेष म्हणजे, या सिनेमात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन या दोघांच्याही मुख्य भूमिका असून, रोमँटिक कॉमेडी सिनेमा असल्याचे अनुराग कश्यप यांनी सांगितले होते. त्याच पाठोपाठ आता मराठीत ‘गुलाबजाम’ याच नावाने सिनेमा बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. ‘गुलाबजाम’ या मराठी सिनेमाची आज घोषणा करण्यात आली आहे. नुकतेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने या सिनेमाचे पोस्टर सोशलमीडियावर ‘आमच्या रेसिपीला सुरूवात झाली’ असे कॅप्शन दिलेले पोस्टर पोस्ट केले आहे. विशेष म्हणजे, सिनेमात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णी एक कपल एक कपल म्हणून झळकणार असल्याचे बोलेल जात आहे. त्यामुळे पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर ही जोडी रोमँटिक भूमिकेत पाहायला मिळू शकते, असे कळतेय. हा सिनेमा सचिन कुंदलकर दिग्दर्शित करीत असून, पुण्यात गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत सिनेमाच्या शूटिंगला सुरुवातही करण्यात आली आहे. सध्या मराठीत वेगवेगळे प्रयोग होत आहेत. त्यानुसार थाटकुडम ब्रिज या म्युझिक बँडचे म्युझिक सिनेमात ऐकायला मिळणार आहे. ‘वजनदार’ सिनेमात सचिन कुंदलकरने सई ताम्हणकर आणि प्रिया बापट या अभिनेत्रींना घेऊन सिनेमात वेगवेगळे प्रयोग केले होते. रसिकांकडूनही ‘वजनदार’ सिनेमाचे
खूप कौतुक करण्यात आले होते. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा सचिन कुंडलकर त्याच्या आगामी सिनेमात रसिकांना देणारा ‘गुलाबजाम’ नक्कीच मनोरंजनाचा बार उडवून देणारा ठरणार आहे, हे मात्र नक्की.