अक्षयसोबत रोमान्स करणार कृती
By Admin | Updated: June 26, 2014 22:36 IST2014-06-26T22:36:59+5:302014-06-26T22:36:59+5:30
‘हिरोपंती’च्या यशाचा फायदा टायगर श्रॉफसोबत चित्रपटाची हिरोईन कृती सेनलाही होताना दिसतो आहे.

अक्षयसोबत रोमान्स करणार कृती
>‘हिरोपंती’च्या यशाचा फायदा टायगर श्रॉफसोबत चित्रपटाची हिरोईन कृती सेनलाही होताना दिसतो आहे. नुकतेच कृतीला बॉलीवूडच्या टॉप हीरोसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. सिंह इज ब्लिंग या चित्रपटात कृती अक्षयच्या हिरोईनच्या भूमिकेत दिसेल. अक्षयने हिरोपंती पाहिला आहे. त्याला कृतीचा अभिनय खूप आवडला. सिंह इज ब्लिंगचे दिग्दर्शन प्रभुदेवा करणार आहे. सिंह इज ब्लिंगमध्ये कृती एका डांसरच्या भूमिकेत दिसेल. कृती उंच, सडपातळ असून नृत्यातही पारंगत असल्याने तिची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असून दक्षिण आफ्रिके त चित्रित करण्यात येणार आहे.