दिग्दर्शक बनण्याची रितेशची इच्छा

By Admin | Updated: June 23, 2014 11:12 IST2014-06-23T11:03:16+5:302014-06-23T11:12:51+5:30

दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरण्याची इच्छा अभिनेता रितेश देशमुख याने व्यक्त केली आहे.

Riteish's desire to become a director | दिग्दर्शक बनण्याची रितेशची इच्छा

दिग्दर्शक बनण्याची रितेशची इच्छा

>अभिनय केल्यानंतर सध्या मी निर्मात्याची भूमिका वठवीत आहे. निर्माता म्हणून संपूर्ण चित्रपटावर तुमचे वर्चस्व असते, तर दिग्दर्शक हा चित्रपटाची पायाभरणी करीत असतो. दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरण्याची माझी इच्छा आहे; परंतु सध्या ते शक्य नाही. भविष्यात मात्र नक्कीच चित्रपट दिग्दर्शित करेल, असे रितेशने सांगितले. ‘यलो’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपटाची निर्मिती रितेशने केली आहे. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाद्वारे २00३ या वर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा रितेश २0१२ या वर्षी जेनेलिया डिसुझाशी विवाहबद्ध झाला होता.

Web Title: Riteish's desire to become a director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.