रितेश देशमुख काढणार 'छत्रपती शिवाजी महाराजां'वर चित्रपट
By Admin | Updated: December 26, 2015 16:02 IST2015-12-26T15:59:38+5:302015-12-26T16:02:59+5:30
अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेले 'छत्रपती शिवाजी महाराज' यांच्या जीवनावर लवकरच मराठीत चित्रपट येणार असून अभिनेता रितेश देशमुख त्याची निर्मिती करणार आहे.

रितेश देशमुख काढणार 'छत्रपती शिवाजी महाराजां'वर चित्रपट
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेले 'छत्रपती शिवाजी महाराज' यांच्या जीवनावर लवकरच मराठीत चित्रपट येणार असून अभिनेता रितेश देशमुख प्रेक्षकांसाठी हा चित्रपट घेऊन येणार आहे. खुद्द रितेशने ट्विटरवरून ही घोषणा केली असून रवी जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे त्याने नमूद केले आहे. रितेशची 'मुंबई फिल्म कंपनी' या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
‘मुंबई फिल्म कंपनीच्या "छत्रपती शिवाजी" चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार असून, ही घोषणा करताना मला अत्यंत अभिमान वाटत आहे’ असं ट्विट रितेशने केले आहे. मात्र या चित्रपटात शिवरायांची भूमिकेसह इतर महत्वाच्या भूमिका कोण करणार, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. पण रितेशची कंपनीच या चित्रपटाची निर्मिती करत असल्याने तोच ही मुख्य भूमिका साकारण्याची शक्यता आहे.
रवी जाधव यांनी नटरंग, बालक पालक, टाईमपास, टाईमपास 2 यासारख्या अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.