Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी रिया 'या' व्यक्तीशी बोलली 1 तास, जाणून घ्या कोणाला केले शेवटचे 5 कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 15:13 IST

सुशांतच्या आर्थिक व्यवहाराच्या अनियमिततेबाबत सक्तवसुली संचालनालय (ईडी) करीत असलेल्या चौकशीतून अनेक बाबी समोर येत आहेत.

मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत आहेत. सुशांतच्या आर्थिक व्यवहाराच्या अनियमिततेबाबत सक्तवसुली संचालनालय (ईडी) करीत असलेल्या चौकशीतून अनेक बाबी समोर येत आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीने तिच्या मोबाईलवरून 'AU' नावाच्या व्यक्तीला तब्बल 63 वेळा कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्समधूनही अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, रियाने 8 जून रोजी सुशांतचं घर सोडलं होतं. तिच्या कॉल डिटेल्समध्ये तिचं महेश भट्ट यांच्याशी अनेकदा बोलणं व्हायचं असं समोर आलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, सुशांतने आत्महत्या केली त्यादिवशी म्हणजेच 14 जून रोजी रिया एका महिलेशी फोनवर जवळपास एक तास बोलली आहे. रिया आणि सुशांतचं शेवटचं बोलणं हे 5 जून रोजी झालं असल्याचं देखील डिटेल्समधून समोर आलं आहे. रियाच्या म्हणण्यानुसार, रियाने तोपर्यंत सुशांतचे घर सोडले नव्हते. 5 जून रोजी सकाळी 8 वाजून 19 मिनिटांनी सुशांतने रियाला फोन केला होता. दोघांमध्ये सुमारे 2 मिनिटांचं बोलणं झालं. त्यानंतर रियाने रात्री 10 च्या सुमारास सुशांतला फोन केला. हा फोन फक्त तीन सेकंदांचा होता. हे त्यांचे शेवटचे संभाषण होते.

सुशांतच्या मृत्यूच्या एक दिवस आधी म्हणजे 13  जून रोजी सात वाजून 50 मिनिटांनी रियाने कास्टिंग डायरेक्टर निशा चटालिया हिला फोन केला होता. रात्री 8 वाजून 53 मिनिटांवर रिया आणि निशामध्ये एका मिनिटांचं बोलणं झालं. यादरम्यान रियाने 8 वाजून 26 मिनिटांनी दिग्दर्शक-निर्माते इंद्रजीत नातोजी यांना देखील फोन केला होता. 9 वाजून 21 मिनिटांनr तिने रूपा चड्ढा नावाच्या महिलेला फोन केला होता. रुपाशी रियाने जवळपास 7 मिनिट 8 सेकंदांपर्यंत चर्चा केली. यानंतर 9 वाजून 43 मिनिटाला AU नावाच्या व्यक्तीला कॉल केला. या व्यक्तीशी रियाने 1 मिनिट 38 सेकंद चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. 

14 जून रोजी रियाने एकूण नऊ फोन केले आणि तिला सात फोन आले. सुशांतचा मृत्यू झाला त्यादिवशी सकाळी 7 वाजून 38 मिनिटांनी रियाने राधिका मेहता नावाच्या व्यक्तीला कॉल केला होता. दोघीही साधारणपणे 30 मिनिटं 33 सेकंद बोलल्या. हा फोन रियाने स्वतः केला होता. त्यानंतर सकाळी 8 वाजून 8 मिनिटांनी राधिकाने रियाला कॉल केला. परत दोघी अर्धातास बोलल्या. यानंतर परत एकदा 8 वाजून 38 मिनिटांनी रियाने राधिकाला कॉल केला आणि दोघीचं 3 मिनिटं 38 सेकंद बोलणं झाल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

"कोरोनाची लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारने रणनीती आखण्याची गरज"

भयंकर! एकटं राहण्यासाठी 'तो' कुटुंबाच्या जीवावर उठला, आईस्क्रिममध्ये विष टाकून बहिणीची हत्या

'दारूची दुकाने उघडली आणि जिम बंद, हे अतिशय दुर्दैवी', फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, म्हणाले...

Jammu And Kashmir : श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; 2 पोलीस कर्मचारी शहीद, एक जखमी

CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; चिंता वाढवणारी आकडेवारी

"मी काय केलं होतं?, माझ्या घरावर का हल्ला केला?, माझं घर का पेटवलंत?"

Video - पावसाचे थैमान! ....अन् साचलेल्या पाण्यात अडकली रुग्णवाहिका

Video - कडक सॅल्यूट! पीपीई किट काढताना अशी होते कोरोना योद्ध्यांची अवस्था, वाहतात घामाच्या धारा

 

 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतसुशांत सिंगरिया चक्रवर्तीबॉलिवूडपोलिस