संगीताच्या जागी रविना
By Admin | Updated: June 27, 2014 23:11 IST2014-06-27T23:11:03+5:302014-06-27T23:11:03+5:30
अभिनेत्री संगीता बिजलानीला कास्ट करण्यात आले होते; पण तिने चित्रपटाला नकार दिल्याने तिची जागा रविना टंडन घेणार आहे.

संगीताच्या जागी रविना
>बॉलीवूडमध्ये एखाद्या चित्रपटाला कलाकाराने नकार दिला, तर त्याची जागा दुसरा कलाकार भरून काढतो. दिग्दर्शक ओनिरच्या आगामी चित्रपटात 9क् च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री संगीता बिजलानीला कास्ट करण्यात आले होते; पण तिने चित्रपटाला नकार दिल्याने तिची जागा रविना टंडन घेणार आहे. या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्याचा निर्णय संगीताने घेतला होता; पण चित्रपटात काही बोल्ड दृश्ये असल्याने तिने हा चित्रपट नाकारला. ओनिरनेही या बातमीला दुजोरा दिला आहे. रविना चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्याचे त्याने म्हटले आहे. चित्रपटात संजय सुरीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.