रणदीप, चित्रंगदाची पडद्यावर जोडी
By Admin | Updated: July 25, 2014 22:46 IST2014-07-25T22:46:04+5:302014-07-25T22:46:04+5:30
चि त्रपट दिग्दर्शक प्रवाळ रमण यांच्या आगामी चित्रपटात अभिनेता रणदीप हुडा आणि चित्रंगदा सिंह ही जोडी दिसण्याची शक्यता आहे.

रणदीप, चित्रंगदाची पडद्यावर जोडी
चि त्रपट दिग्दर्शक प्रवाळ रमण यांच्या आगामी चित्रपटात अभिनेता रणदीप हुडा आणि चित्रंगदा सिंह ही जोडी दिसण्याची शक्यता आहे. एका वास्तविक कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात रणदीप एका खासदाराच्या भूमिकेत दिसेल. डरना मना है, गायब, एरर नॉट फाऊंडसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक प्रवाळ रमण सध्या चाल्र्स शोभराज या सिरियल किलरवर आधारित चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाचे नाव ‘मै और चाल्र्स’ असे आहे. या चित्रपटातही रणदीप मुख्य भूमिकेत आहे. यापुढील त्याचा चित्रपट एका वास्तविक कथेवर आधारित असून त्यात डॉ. अजयकुमार नावाच्या एका डॉक्टरची कहाणी दाखवण्यात येणार आहे. डॉक्टर असलेले अजयकुमार एक वरिष्ठ पोलीस अधिकारी बनतात आणि त्यानंतर निवडणुका जिंकून खासदारही होतात. डॉ. अजय यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक लोकांना मदत केली आहे. त्यांनी भारतातील अनेक गावांमध्ये एकूण 17 हजार सोलर पॅनेल लावले आहेत.