रजनीकांतच्या 'कबाली'ची एका दिवसात तब्बल 250 कोटींची कमाई

By Admin | Published: July 23, 2016 07:37 PM2016-07-23T19:37:50+5:302016-07-23T19:48:13+5:30

दाक्षिणात्य सुपरस्टार यांच्या 'कबाली' चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडत फक्त पहिल्या दिवशी तब्बल 250 कोटींची कमाई केली आहे

Rajinikanth's 'Kabbali' earns a whopping Rs 250 crore in one day | रजनीकांतच्या 'कबाली'ची एका दिवसात तब्बल 250 कोटींची कमाई

रजनीकांतच्या 'कबाली'ची एका दिवसात तब्बल 250 कोटींची कमाई

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
चेन्नई, दि. 23 - दाक्षिणात्य सुपरस्टार यांच्या 'कबाली' चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडत फक्त पहिल्या दिवशी तब्बल 250 कोटींची कमाई केली आहे. भारतासोबत चीन, मलेशिया आणि इतर देशांमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या कबाली चित्रपटाने फक्त तामिळनाडूमध्येच 100 कोटींची कमाई केली असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. रिलीज होण्याआधीच कबाली चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. सोशल मिडियावरदेखील चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. पहिल्यांदाच सकाळी 5 वाजल्यापासून चित्रपटाचे शो सुरु करण्यात आले होते.
 
भारतामध्ये चित्रपटाने 250 कोटींची कमाई केली आहे. यामध्ये तामिळनाडूत करण्यात आलेल्या 100 कोटींचादेखील सहभाग आहे. तामिळनाडू व्यतिरिक्त इतर राज्यांत चित्रपटाने 150 कोटींची कमाई केली आहे अशी माहिती निर्मात्यांनी दिली आहे. निर्मात्यांनी जरी 250 कोटी कमावल्याचा दावा केला असला तरी अधिकृतपणे हा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. 
काबूली जगभरातील तब्बल 8 ते 10 हजार स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला होता. यामध्ये अमेरिकेतील 480, मलेशियातील 490 आणि आखाती देशांमधील 500 देशांचा समावेश आहे. युके, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, स्वित्झर्लंड, डेन्मार्क, हॉलंड, स्वेडन, दक्षिण अफ्रिका आणि नायजेरिया या देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. जगभरात चित्रपटाने 100 कोटींचा व्यवसाय केला आहे. 
 
(REVIEW: कबाली - इमोशनच्या नादात अडकलेला अॅक्शन सिनेमा)
 
'कोणत्याही भारतीय अभिनेत्याने केलेली आतापर्यंतची ही सर्वोत्तम कमाई आहे. यावरुन आपल्याकडे एकमेव रजनीकांत सुपरस्टार असल्याचं दिसतं', असं दिग्दर्शन रंजीथ यांनी म्हटलं आहे.
 
रजनीकांत यांच्या चित्रपटांचं वेड इतकं आहे की चेन्नई, बंगळुरुमधील कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. इतकंच नाही सोशल मिडियावरही जोक्सनी धुमाकूळ घातला होता. 'सलमान, शाहरुख सुट्ट्यांना चित्रपट रिलीज करतात मात्र रजनीकांत यांनी चित्रपट रिलीज केला की सुट्टी जाहीर होते' हा विनोद तर हमखास रोज कोणत्या ना कोणत्या व्हाट्सअॅप ग्रुपवर पडतो आहे. एका चाहत्याने तर आपल्या एक दोन नाही तर 200 मित्रांसाठी चित्रपटाचा शो बुक केला, आणि यासाठी मोजले तब्बल 1 लाख 2 हजार 500 रुपये. विश्वास नाही बसत मग पाहा की पावती... 
 
 
 

Web Title: Rajinikanth's 'Kabbali' earns a whopping Rs 250 crore in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.