पुलकितने सोडलाकरणचा चित्रपट

By Admin | Published: November 19, 2014 01:26 AM2014-11-19T01:26:45+5:302014-11-19T01:26:45+5:30

अभिनेता पुलकित सम्राटने करण जोहरच्या चित्रपटाला ऐनवेळी नकार दिल्याची बातमी आहे.

Pulkitane Leaked Movie | पुलकितने सोडलाकरणचा चित्रपट

पुलकितने सोडलाकरणचा चित्रपट

googlenewsNext

अभिनेता पुलकित सम्राटने करण जोहरच्या चित्रपटाला ऐनवेळी नकार दिल्याची बातमी आहे. ‘वी आर इंडियन्स’ असे नाव असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग तीन आठवड्यांमध्ये सुरू होणार होते; पण अचानक पुलकितने नकार कळवल्याने निर्मात्यांसमोर समस्या निर्माण झाली आहे. सूत्रांनुसार पुलकितने चित्रपट सुरू होण्याच्या २० दिवसांपूर्वी नकार कळवला आहे. तो नुकताच हनिमूनवरून परतला असून सध्या अडल्ट कॉमेडी करण्याचा त्याचा मूड नाही. त्याच्याकडे अजूनही काही चित्रपटांच्या आॅफर्स आहेत.’ शूटिंगची तारीख जवळ आली आहे, त्यामुळे दिग्दर्शिका सोनम नायरला नव्या चेहऱ्यांचे आॅडिशन घ्यावे लागत आहे. रणविजय सिंहचा भाऊ हरमनने या भूमिकेसाठी आॅडिशन दिल्याचे समजते. या चित्रपटात दिशा पाटणी नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Pulkitane Leaked Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.