प्रियांका चोप्राने केली 'बेवॉच'च्या शुटींगला सुरुवात
By Admin | Updated: March 2, 2016 14:33 IST2016-03-02T14:28:39+5:302016-03-02T14:33:15+5:30
प्रियांका चोप्राचे शुटींगदरम्यानचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे

प्रियांका चोप्राने केली 'बेवॉच'च्या शुटींगला सुरुवात
>ऑनलाइन लोकमत -
लॉस ऐंजेलिस, दि. २ - बॉलिवूड अभिनेत्री प्रियाका चोप्राने बेवॉच चित्रपटाच्या शुटींगसाठी सुरुवात केली आहे. प्रियांका चोप्राचे शुटींगदरम्यानचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. प्रियांका चोप्रा या बेवॉचमध्ये खलनायिकेची भुमिका साकारत आहे. क्वांटिको मालिकेमुळे आधीच प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या प्रियांचा चोप्राचा हा हॉलिवूडमधील पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ड्वेन जॉन्सन, जॅक अफ्रॉन असणार आहेत. हा चित्रपट १९ मे २०१७ ला रिलीज होणार आहे.