प्रार्थना बेहेरे आणि भूषण प्रधान एकत्र
By Admin | Updated: February 22, 2017 05:44 IST2017-02-22T05:43:53+5:302017-02-22T05:44:02+5:30
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट येऊ घालत आहेत. मात्र या सर्व आगामी

प्रार्थना बेहेरे आणि भूषण प्रधान एकत्र
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट येऊ घालत आहेत. मात्र या सर्व आगामी चित्रपटांमध्ये एक खासियत असल्याचे पाहायला मिळतेय. ती म्हणजे, मराठी चित्रपटसृष्टीत येऊ घालणाऱ्या चित्रपटांमध्ये अनोख्या जोड्या पाहायला मिळणार आहेत. आता हेच पाहा ना, काही दिवसांपूर्वीच गश्मिर महाजनी आणि स्पृहा जोशी एकत्रित एका आगामी चित्रपटात पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगली. आता याच्यापाठोपाठ प्रेक्षकांना आणखी एक अनोखी जोडी एका आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ती जोडी म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि भूषण प्रधान यांची. ही जोडी प्रेक्षकांना लवकरच एका आगामी चित्रपटाच्या माध्यमातून दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हा सुखद धक्का असणार आहे. प्रार्थना बेहेरे आणि भूषण प्रधान या जोडीचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्यापदेखील कळाले नाही. यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.