‘घायल वन्स अगेन’ पुढे ढकलला
By Admin | Updated: January 8, 2016 01:50 IST2016-01-08T01:50:04+5:302016-01-08T01:50:04+5:30
सनी देओल यांचा आगामी चित्रपट ‘घायल वन्स अगेन’ १५ जानेवारी रोजी रिलीज होणार होता, पण आता ५ फेब्रुवारीपर्यंत तो लांबणीवर जाणार असल्याचे कळते.

‘घायल वन्स अगेन’ पुढे ढकलला
सनी देओल यांचा आगामी चित्रपट ‘घायल वन्स अगेन’ १५ जानेवारी रोजी रिलीज होणार होता, पण आता ५ फेब्रुवारीपर्यंत तो लांबणीवर जाणार असल्याचे कळते. सनी देओल लिखित आणि दिग्दर्शित चित्रपटाचे जास्त प्रमोशन झालेच नाही. केवळ चित्रपटाचे प्रमोशन झाले नाही म्हणून आता चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलली आहे. या चित्रपटाची रिलीज डेट दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. मागील वर्षाच्या शेवटी चित्रपटाची तारीख ठरवली होती. ‘प्रेम रतन धन पायो’ सोबतच रिलीज करण्याचा विचार होता पण व्हीएफएक्सचे काम बाकी असल्याने बाकी काहीही जमू शकले नाही.