सनी लियोनीने चक्क डायपरपासून बनवला मास्क, सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 15:30 IST2020-04-22T15:28:00+5:302020-04-22T15:30:01+5:30

कोरोनामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. या दरम्यान सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही थांबवण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या सेलिब्रेटी आपापल्या घरात असून सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संपर्क साधत आहेत.

सनी लियोनी सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांच्या संपर्कात आहे.

सनीचे काही सोशल मीडियावरचे फोटो व्हायरल झाले आहेत. एका फोटोत सनी चक्क लहान मुलांच्या डायपरने मास्क बनवताना दिसत आहे.

केवळ डायपरपासून नव्हे तर मच्छरदाणी, कार्टून मास्क यापासून देखील तिने मास्क बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

तुमच्याकडे खूपच कमी वेळ असेल आणि घरात जलदगतीने मास्क बनवायचा असेल तर डायपरपासून मास्क बनवणे अगदी सोपे आहे असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

सनी तिच्या कुटुंबियांसोबत अनेक फोटो, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.

सनी ही एक पॉर्न स्टार असून तिने काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमधील तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

सनी लवकरच 'वीरमादेवी' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.